MPSC चालू घडामोडी 11 जुलै 2024
नमस्कार मित्रांनो ,आज आपण एम पी एस सी ( mpsc ) 11 जुलै 2024 चालू घडामोडी बघुयात.
1. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ?
उत्तर. डॉ. सौम्या स्वामीनाथन.
2. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाचे नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर. गौतम गंभीर ( राहुल द्रविड यांच्या जागी गौतम गंभीर यांना भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे ).
3. एफ ए टी एफ ( FATF ) संस्थाचे अध्यक्ष कोणास करण्यात आले ?
उत्तर. एलिसा डी अंडा मद्राझो , यांना एफ ए टी एफ ( FATF ) या संस्थेचे अध्यक्ष पद देण्यात आले.
4. ( CURIE ) मोहीम काय आहे ?
उत्तर. क्यूबसॅट रेडिओ इंटरफेरोमेट्री प्रयोग.
5. राष्ट्रीय संवर्धन पशु दुग्ध उत्पादन पशुसंवर्धन मंत्रालय यांच्या मार्फत कोणते पुरस्कार दिला जात आहे ?
उत्तर. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार.
6. राष्ट्रीय मत्स्य किसान दिवस कधी साजरा केला जात आहे ?
उत्तर. 10 जुलै.
तर, वरील काही मुद्द्यांवर चर्चा करुया :
1. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून हरित क्रांतीचे जनक दिवंगत भारतरत्न एम एस स्वामीनाथन यांची सुकन्या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
– प्रोफेसर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
– प्रमुख सल्लागार म्हणून प्रा. स्वामीनाथन कार्यक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकंदर धोरणावर तांत्रिक सल्ला देतील. उत्तम परिणामांसाठी धोरणात्मक दिशा निर्देश आणि आवश्यक अभ्यासक्रम सुधारणा सुचवतील आणि संशोधन धरणावर सल्ला देतील.याशिवाय कार्यक्रमाच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी ते केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राज्य प्राधिकरणे आणि विकास भागीदारांना मदत करेल.
– प्रो. स्वामीनाथन हे जागतिक आरोग्य संघटनेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ( इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ) मध्ये ICMR चे महासंचालक म्हणूनही काम केलेले आहे.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ( NTEP )
• पूर्वी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम ( RNTCP ) म्हणून ओळखला जात होता,
• हा भारत सरकारचा सार्वजनिक आरोग्य उपक्रम आहे, जो क्षयरोग विरोधी प्रयत्नांचे आयोजन करतो.
• हे राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) चा प्रमुख घटक म्हणून कार्यकर्ते आणि देशातील क्षयरोग विरोधी उपक्रमांना तांत्रिक आणि व्यवस्थापकीय नेतृत्व प्रदान करते.
2. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरणे तीन वर्षाचा करार केला आहे त्याने राहुल राहुल यांची जागा घेतलेली आहे.
गौतम गंभीर हे 2019 ते 2024 या काळात 17 व्या लोकसभेचे सदस्य होते. खासदार होते बीजेपी कडून, परंतु आता त्यांना बीजेपी खासदाराचे पद सोडले आहे व आपले पूर्ण लक्ष स्पोर्ट मध्ये देत आहेत. व केकेआर ( KKR ) चा कोच झाला आहे, व केकेआर ( ( KKR ) ला विजय मिळवून दिला आहे.
• 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार सलग चार कसोटी मालिकेत 300 हून अधिक धावा करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे.
• वेस्टइंडीज आणि युनायटेड स्टेट्स येथे झालेल्या 9 व्या ICC T20 विश्वचषक भारतीय संघाच्या विजयानंतर पद सोडलेल्या राहुल द्रविडची जागा गंभीर यांनी घेतलेली आहे.
• राहुल द्रविड ची 2021 मध्ये तीन वर्षासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
3. FATF च्या अध्यक्ष असलेल्या एलिसा डी अंडा मद्रास या मेक्सिको देशाच्या आहेत.
– मेक्सिकोच्या एलिसाडीअंडा मद्रासो या एक जुलै 2024 ते 30 जून 2026 या कालावधीत एफ ए टी एफ अध्यक्ष आहेत. त्या सिंगापूरचे श्री टी राजा कुमार यांच्या नंतर आल्या.
– सुश्री डी अंडा यांना मनी लॉंड्रिंग विरोधी आणि दहशतवादाच्या वेद पुरवठा सेक्टरमध्ये निवृत्तीच्या पदावर एकदशकाहून अधिक अनुभव आहे.
FATF मध्ये सुश्री डी अंजा अंडा या महत्त्वपूर्ण कार्यात मोठ्या प्रमाणावर गुंतल्या आहेत आणि त्यांनी बहुतेक नेतृत्व पदे भूषवली आहेत ज्यामुळे त्यांना एस ए टी एस चे सखोल ज्ञान मिळते.
• जुनू 2023 पर्यंत तिने तीन वर्ष उपाध्यक्ष.
यापूर्वी तिने मेक्सिकन प्रतिनिधी मंडळाच्या प्रमुख म्हणून काम केले आणि 2026 ते 2017 मध्ये मेक्सिकोच्या परसपर मूल्यमापनासाठी प्रयत्नांचे सह नेतृत्व केले.