21 जून 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

जागतिक योग दिन
जागतिक योग दिन

चालू घडामोडी (जून २१, २०२२)

‘अग्निपथ’ योजनेसंबंधी महत्वाचा निर्णय होणार :

 • केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्नीचा मार्ग’ योजनेविरोधात देशभरात आंदोलन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्यदल प्रमुखांची भेट घेणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांना भेटणार आहेत.
 • अग्निपथ योजनेला होणार विरोध आणि त्यानंतर सैन्यदल प्रमुखांनी त्यावर जाहीर केलेली भूमिका या पार्श्वभूमीवर सर्वांच लक्ष या बैठकीकडे असेल.
 • दरम्यान अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असताना लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला.
 • त्याचबरोबर, ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारे बंद असतील, असा इशाराही दिला.

तृतीयपंथी जलतरणपटूंसाठी जागतिक संघटनेकडून नवे धोरण :

 • जागतिक जलतरण संस्थेने (फिना) तृतीयपंथी खेळाडूंसाठी नवे धोरण स्वीकारले असून याअंतर्गत वयाच्या 12व्या वर्षांपूर्वी संक्रमण केलेल्या जलतरणपटूंनाच महिलांच्या स्पर्धामध्ये सहभाग घेण्याची परवानगी असेल.
 • ‘फिना’च्या सदस्यांनी रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या ‘लिंग समावेश धोरणा’च्या बाजूने 71.5 टक्के मतदान केले.
 • त्यामुळे सोमवारपासून सर्व स्पर्धासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
 • 24 पानी धोरणात नव्या ‘खुल्या स्पर्धा’ श्रेणीच्या प्रस्तावाचाही समावेश आहे.
 • एक नवीन गट स्थापन करण्यात येणार असून तो पुढील सहा महिने ही नवीन श्रेणी कशा पद्धतीने योग्यपणे तयार करता येईल याबाबतचा आढावा घेईल,असे ‘फिना’कडून सांगण्यात आले.
 • गेल्या गुरुवारी सायकिलगच्या जागतिक संस्थेने तृतीयपंथी खेळाडूंसाठीचे नियम अधिक कठोर पात्रता नियमांमध्ये बदल करताना.
 • त्यामुळे तृतीयपंथी सायकलपटूंना स्पर्धामध्ये सहभागी होण्यापूर्वी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 • आंतरराष्ट्रीय सायकल संघटनेने (यूसीआय) टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाच्या किमान पातळीचा संक्रमणाचा काळ दोन वर्षांपर्यंत वाढवला असून कमाल स्वीकाहार्य पातळी कमी केली आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा :

 • येत्या 28 जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
 • या स्पर्धेत जवळपास 72 देशांतील पाच हजार 54 खेळाडू सहभाग घेण्याची शक्यता आहे.
 • या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने सोमवारी 18 सदस्यीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाची घोषणा केली आहे.
 • आयनप्रीत सिंगची कर्णधारपदी तर ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
 • राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय संघाला इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना सोबत पूल ‘ब’मध्ये ठेवण्यात आले आहे.

16 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या मर्जीने लग्न करु शकते:

 • अल्पवयीन विवाहाबाबत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एक मोठा निकाल जाहीर केला आहे.
 • एका खटल्याची सुनावणी करताना न्यायलयाने म्हटले आहे की, 16 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या मर्जीने लग्न करु शकते.
 • न्यायमूर्ती जसजित सिंग बेदी यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर केला आहे.
 • 21 वर्षीय मुलगा आणि 16 वर्षीय मुस्लीम मुलगी या प्रेमी जोडप्याने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दिनविशेष :

 • 21 जून हा दिवस जगभरात ‘जागतिक योग दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • भारतीय लेखक आणि नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म 21 जून 1912 मध्ये झाला.
 • 1948 मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले होते.
 • 21 जून 1949 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
 • जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरुवात 21 जून 2015 पासून झाली.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment