About Us

आमच्याबद्दल :-

प्रिय मित्रांनो,

                    देशात दररोज रेल्वे, बँका, पोलीस, सैन्य अशा विविध क्षेत्रातील सरकारी नोकऱ्या बाहेर पडत असतात. ज्यासाठी लाखो लोक अर्ज करतात आणि परीक्षेची तयारी करतात आणि परीक्षा देतात. पण काही मोजकेच लोक आहेत जे परीक्षा उत्तीर्ण होतात आणि सरकारी नोकरीसाठी निवडले जातात. अनेकांना सरकारी नोकरी मिळत नसल्याने ते हताश झाले आहेत. सरकारी नोकऱ्या न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात. त्याचे एक कारण हे देखील आहे की त्याने एकतर मेहनत केली नाही किंवा कुठेतरी ज्ञानाची कमतरता होती. त्यामुळे आम्ही या वेबसाइट च्या माध्यमातमातून सर्व विषयाच्या फ्री टेस्ट देण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून जास्तीत जास्त संखेने महाराष्ट्रातील माझ्या बाधवांना सरकारी नोकरीमध्ये यश संपादन करण्यास मदत होईल हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

                जळगाव  जिल्ह्यात असलेल्या जामनेर तालुक्यातील तळेगाव या साधारणतः तीन ते चार हजार लोकवस्तीच्या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला. आईचे शिक्षण चौथी पर्यंतच झाले असले तरी मात्र आमच्या वडिलांचे शिक्षण BA इंग्लिश या विषयात झाले होते. आमच्या कुटुंबात आम्ही दोन बहिनी आणि  दोन भाऊ असा परिवार होता. दोन्ही मुलांनी खूप शिक्षण घेऊन किमान एका मुलाने तरी सरकारी नोकरी करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे स्वप्न उराशी बाळगून अतिशय काबाड-कष्ट करून विश्वासाने झगडत आमच्या शिक्षणासाठी अटोकाट प्रयत्न करत होते. मी मात्र त्यांच्या विश्वासास पात्र न ठरता 2005 साली दहावीची परीक्षा न देता शिक्षणाला रामराम ठोकला. आणि मिळेल ती कामे करायला सुरूवात केली .

                   मी नंतर टेलर काममद्धे 10 वर्ष काम केले आणि त्यानंतर मी परत 2013 साली 10 वी ला अँडमिशन घेऊन 2018 साली BA पास झालो. या सर्व काळात खूप शिकायला मिळाले की शिक्षण हे कधीही वाया जात नाही . त्यानंतर बऱ्याच पोलिस भरती मारल्या परंतु 2 ,3 मार्कनी पेपरला बसायचो नाही. वयाच्या 33 वर्षापर्यंत पराकोटीचे प्रयत्न करूनही दारोदार फिरताना नको वाटणाऱ्या जीवनातील झालेल्या वेदना आजही अगदी जिवंतआहेत.दहावी नंतर शिक्षण सोडण्याचा एक चुकीचा निर्णय आणि स्वतःची क्षमता कधी पडताळून पाहण्याची संधीच न मिळाल्याने ऐन उमेदीच्या काळातील तब्बल आठ वर्ष भटकंती करण्यातच गेली. आणि सरकारी नोकरी मिळवण्याचे माझे स्वप्न हे स्वप्नच राहिले.

               त्यामुळे आपल्याला अभ्यास करतांना आलेल्या अडचणी आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने असंख्य माझे मित्र सरकारी नोकरी मिळऊ शकत नाही परंतु त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी करण्याचा मानस आमचा आहे . त्यांना या वेबसाइट च्या माध्यमातून रोजच्या चालू घडामोडी ,सर्व विषयाच्या उत्कृष्ट फ्री टेस्ट आम्ही या ठिकाणी सर्वांना उपलब्ध करून देणार आहे . जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम माझ्या मित्रांना येणऱ्या परीक्षेत जास्तीत जास्त मार्क पडून त्यांना  सरकारी नोकरीत यश संपादन व्हावे हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे ………धन्यवाद .

आपला

उमेश गोरे

संस्थापक – GSESTUDYPOINT.IN [ एड्युकेशन वेबसाइट ]

संपर्क :- GSESTUDYPOINT@GMAIL.COM

आमच्याबद्दल :-

साइट, जाहिरात आणि इतर कोणत्याही समस्येबाबत तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया GSESTUDYPOINT@GMAIL.COM वर संपर्क साधा.


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.