10 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी / Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

10 नोव्हेंबर 2021

1. भारतीय क्रिकेट T20 संघाचा नवा कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : रोहित शर्मा ( कर्णधार ), लोकेश राहुल ( Vice- कर्णधार ) . 

2. देशाचे पुढील नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : व्हाइस अॅडमिरल आर हरी कुमार.  

3. नवोन्मेष आणि दुहेरी-वापर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधनाला चालना देण्यासाठी DRDO ने कोणत्या देशाशी करार केला आहे ? 

उत्तर : इस्रायल.  

4. प्रोजेक्ट 75 अंतर्गत भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या चौथ्या स्कॉर्पीन पाणबुडीचे नाव काय आहे ? 

उत्तर : बेला.  

5. कोणत्या प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले ? 

उत्तर : कोझिकोड शारदा.  

6. भारतीय नेमबाज राही सरनोवत ( महिला -25 मीटर पिस्तूल स्पर्धा ) आणि मनू बकर (25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धा ) यांनी कोणत्या स्पर्धेत रौप्य आणि सुवर्ण पदके जिंकली ? 

उत्तर : प्रेसिडेंट्स चषक ( पोलंडमध्ये आयोजित ) . 

7. स्टार इंडियाच्या रिलीझनुसार 16 दशलक्ष 70 लाख दर्शकांसह कोणती टी -20 मॅच सर्वाधिक वेळा पहिली गेली आहे ? 

उत्तर : भारत – पाकिस्तान टी – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामाना.  

8. 5G स्मार्टफोन लॉन्च करणारा पहिला भारतीय ब्रँड कोणता आहे ? 

उत्तर : लावा इंटरनॅशनल.  

9. ICC ने ऑक्टोबर 2021 साठी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून कोणाची निवड केली आहे ? 

उत्तर : आसिफ अली ( पाकिस्तान ), लारा Delany ( आयर्लंड ) . 

10. आज (10 नोव्हेंबर ) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : जागतिक विज्ञान दिन.  

11. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) चे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : शीलवर्धन सिंह.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : 11,466 (460 मृत्यू ). 


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment