17 जून 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

 

चालू घडामोडी (१७ जून २०२२)

अमेरिकेत पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणासाठी मंजुरीची शक्यता :

  • अमेरिकेत पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे.
  • अन्न आणि औषध प्रशासनाच्या लसीकरण सल्लागारांनी यासाठी फायझर आणि मॉडर्ना यांच्या लशींना त्यासाठी संमती दिली आहे.
  • पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लशीच्या एका मात्रेचा परिणाम हा करोनाचा धोका कमी करतो, असे मत तज्ज्ञांनी सर्वानुमते व्यक्त केले.
  • तर या देशात लसीकरणासाठी मंजुरी मिळवणारा हा अंतिम गट आहे.
  • संबंधित सर्व शासकीय विभागांनी मंजुरी दिली तर पुढील आठवडय़ात हे लसीकरण सुरू होईल.

चार वर्षांनी निवृत्त झालेल्यांपैकी 75 टक्के अग्निवीरांना सरकारी नोकरी देणार :

  • केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर विरोधी पक्ष या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
  • मात्र असे असताना केंद्रासह अनेक राज्य सरकारांनी अग्निपथ योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या अग्नीवीरांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
  • केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्स भरतीमध्ये अग्निवीर सैनिकांना प्राधान्य दिले जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
  • तर या योजनसंदर्भात आता हरिणाया सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
  • लष्कर, नौदल आणि हवाई दलात विशेष ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत अल्प-मुदतीच्या करारावर भरती झालेल्या ‘अग्नीवीर’ सैनिकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये प्राधान्य मिळेल.
  • हरियाणा सरकारनेही अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे.
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी जाहीर केले की उत्तर प्रदेश सरकार पोलीस आणि संबंधित सेवांमध्ये भरतीसाठी ‘अग्निवीरांना’ प्राधान्य देईल.

केंद्राचा 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी :

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंचार सेवांसाठी 5 जी स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी दिली आहे.
  • यासोबतच या टेलिकॉम स्पेक्ट्रमसाठी आगाऊ रक्कम (अॅडव्हान्स पेमेंट) भरण्याची अटही रद्द करण्यात आली आहे.
  • केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लिलावात यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीला 20 हफ्त्यांमध्ये रक्कम भरण्याचा अवधी दिला जाईल.
  • जुलै अखेरपर्यंत हा लिलाव होणार असून संबंधित करार हे 20 वर्षांच्या वैधतेसह एकूण 72097.75 मेगाहट्झ स्पेक्ट्रमसाठी असतील असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

‘आयसीसी’च्या विशेष पंच श्रेणीत मेनन यांना पुन्हा स्थान :

  • भारताच्या नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विशेष पंच श्रेणीतील (एलिट पॅनल) स्थान कायम राखले आहे.
  • तर या महिन्यात श्रीलंकेमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत त्यांना प्रथमच तटस्थ पंचांची भूमिका पार पाडण्याची संधी मिळेल.
  • इंदूरचे रहिवासी असलेले मेनन हे ‘आयसीसी’च्या 11 सदस्यीय विशेष पंच श्रेणीत स्थान मिळालेले एकमेव भारतीय आहेत.
  • तर गेल्या तीन-चार वर्षांपासून भारताचे आघाडीचे पंच असलेले मेनन यांना ‘आयसीसी’ने नुकतीच एका वर्षांची करारवाढ दिली आहे.
  • तसेच या महिन्याच्या अखेरीस त्यांना तटस्थ पंच म्हणून पदार्पणाची संधी मिळणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

नीरज चोप्राने मोडला राष्ट्रीय विक्रम :

  • ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरी करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एका नव्या विक्रमाला गवसणी घातलीय.
  • फिनलंड पावो नुरमी गेम्स 2022 मध्ये नीरजने 89.30 मीटर दूर भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केलाय.
  • तर यापूर्वीचा विक्रमही नीरजच्याच नावे होते.
  • तसेच मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पतियालामध्ये 88.07 मीटर दूर भाला फेकला होईल.
  • तर 7 ऑगस्ट 2021 रोजी त्याने टोक्यो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावलं होतं.
  • या कामगिरीमुळे नीरज हा अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक पटकावणारा पहिला खेळाडू ठरलेला.
  • टोक्यो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा असून त्याने यामध्ये रौप्य पदकाची कमाई केलीय.
  • तर या स्पर्धेमध्ये फिनलॅण्डच्या ऑलिव्हर हीलॅण्डरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

सुनील छेत्री ठरला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू :

  • भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे.
  • सुनील छेत्रीने मंगळवारी 14 जूनला हाँगकाँगविरोधात एएफसी आशियाई कपच्या पात्रता सामन्यात हा रेकॉर्ड केला.
  • तर या सामन्यात सुनील छेत्रीने 84 वा गोल केला.
  • यासोबतच सुनील छेत्रीने रिअल मॅड्रिडचे दिग्गज आणि हंगेरीचे फुटबॉलर फेरेंक यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.
  • सुनील छेत्रीने याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे पेले यांना मागे टाकलं आहे.
  • सुनील छेत्री सध्या सक्रीय असणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी फक्त रोनाल्डो आणि मेस्सीच्या मागे असून यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत क्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे.

आयसीसीने जाहीर केली टी 20 क्रमवारी :

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेमध्ये भारतीय सलामीवीर ईशान किशनने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे.
  • तर या कामगिरीच्या बळावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी ट्वेंटी क्रमवारीत 68 स्थानांची झेप घेतली आहे.
  • आयसीसीच्या टी ट्वेंटी फलंदाजी क्रमवारीत ईशान सध्या सातव्या स्थानावर पोहचला आहे.
  • पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा टी 20 आणि एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
  • पहिल्या 10 फलंदाजांमध्ये किशन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल 14व्या स्थानावर आहे.
  • कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांची प्रत्येकी एका स्थानाने घसरण झाली असून ते अनुक्रमे 16व्या आणि 17व्या स्थानावर आहेत.

दिनविशेष :

  • १८८५ मध्ये न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.
  • आइसलँडने (डेन्मार्कपासून) 1944 मध्ये स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
  • अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे 1963 मध्ये कायदेबाह्य ठरवले.
  • 1967 मध्ये चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
  • 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
  • १२९७ मध्ये ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला.
  • राजमाता जिजाबाई यांचे निधन 1674 मध्ये झाले.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.