05 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी / Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

05 नोव्हेंबर 2021

1. आज केदारनाथ धाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या प्रसिद्ध गुरूच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले ?

उत्तरः आदि शंकराचार्य.

2. BCCI ने भारतीय क्रिकेट संघाचा पुढील प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

उत्तरः राहुल द्रविड.

3. पश्चिम बंगालच्या कोणत्या मंत्र्याचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले , त्यांचे नाव काय होते ?

उत्तरः सुब्रत मुखर्जी.

4. T20 विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजच्या कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ?

उत्तरः ड्वेन ब्राव्हो.

5. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे ?

उत्तर: भारत बायोटेकची कोवॅक्सीन.

6. अयोध्येत एकाच वेळी किती दिवे लावल्याचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदवला गेला आहे ?

उत्तरः ९,४१,५५१.

7. स्वित्झर्लंड आणि हंगेरीमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तरः संजय भट्टाचार्य (स्वित्झर्लंड), पार्थ सत्पथी (हंगेरी).

8. उत्तर प्रदेश सरकारने मोफत रेशन योजना किती काळासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे ?

उत्तरः मार्च २०२२.

9. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ( IOC ) ने पुढील तीन वर्षांत ई – वाहनांसाठी किती चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची घोषणा केली आहे ?

उत्तरः 10 हजार.

10. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO ) आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे स्वदेशी बनावटीच्या कोणत्या शस्त्राच्या दोन यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत ?

उत्तरः स्मार्ट एअरफील्ड वेपन.

11. गो – फर्स्टच्या श्रीनगर ते शारजाह फ्लाइटला त्याच्या हवाई क्षेत्रातून जाण्यास कोणी नकार दिला ?

उत्तर : पाकिस्तान.

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?

उत्तरः १२,७२९ (२२१ मृत्यू).


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment