31 जुलै 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

मीराबाई चानू

चालू घडामोडी (31 जुलै 2022)

पंतप्रधान मोदींचा काव्यसंग्रह पुढील महिन्यात इंग्रजीत :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजराती भाषेतील काव्यसंग्रह ऑगस्ट महिन्यात इंग्रजीतही उपलब्ध होणार आहे.
  • अनेक वर्षांपासून लिहिलेले आणि ‘डोळे धन्य आहेत’ या शीर्षकाचा हा गुजराती काव्यसंग्रह 2007 मध्ये प्रथम प्रकाशित झाला होता.
  • त्याचा इंग्रजी अनुवाद चित्रपट क्षेत्रातील पत्रकार आणि इतिहासकार भावना सौम्या यांनी केला आहे.
  • भावना सौम्या यांनी सांगितले, की या कविता प्रगती, निराशा, परीक्षा, धीरोदात्तता आणि करुणेचे दर्शन घडवतात.
  • मोदींच्या काव्यात सहजता आणि गूढतेचे प्रतिबिंब आहे. त्यांची कविता संदिग्धतेचा उल्लेख करत त्याची उकल करण्याचा प्रयत्न करते.

गुजरातमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरामधील गांधी नगर येथे देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचे (IIBX) उद्घाटन केले.
  • या बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून आता देशातील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांना परदेशातून सोने आयात करणे सोपे होणार आहे.
  • शांघाय गोल्ड एक्सचेंज आणि बोर्सा इस्तंबूलच्या धर्तीवर हे एक्सचेंज स्थापन करण्यात आले आहे.
  • या एक्सचेंजद्वारे डीलर्स, रिफायनरीज आणि परदेशी बँकांना भारताकडे आकर्षित करण्यास मदत होणार आहे.
  • गांधीनगर जवळील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT सिटी) येथे आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना करण्यात आली आहे.
  • देशातील हे पहिले आंतरराष्ट्रीय सराफा एक्सचेंज असेल.

मिग-21 च्या उर्वरित चार स्कॉड्रन 2025 पर्यंत सेवाबाह्य :

  • भारतीय हवाई दलातील मिग-21 च्या उर्वरित चार लढाऊ स्कॉड्रन येत्या तीन वर्षांत सेवाबाह्य केल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
  • यापैकी एक स्कॉड्रन आगामी सप्टेंबरमध्येच सेवाबाह्य होणार आहे.
  • त्याचप्रमाणे मिग-29 लढाऊ जेटच्या तीन स्कॉड्रनही पुढील पाच वर्षांत सेवेतून बाहेर काढण्याचे नियाजन भारतीय हवाई दलाने केले असल्याचेही या सूत्रांचे म्हणणे आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात मीराबाईची सुवर्णझळाळी :

  • मीराबाईने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या वेटलिफ्टिंगमधील 49 किलो वजनी गटात विक्रमी वजनासह सुवर्णपदकाची कमाई केली.
  • तर हे तिचे राष्ट्रकुलमधील सलग दुसरे, तर भारताचे यंदाच्या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले.
  • तसेच गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या मीराबाईने आपला दबदबा कायम ठेवताना शनिवारी स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो असे एकूण 201 किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केले.
  • तिने स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजन या तिन्ही विभागांमधील राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजनाचे विक्रम आपल्या नावे केले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात सांगलीच्या संकेतला रौप्यपदक :

  • महाराष्ट्राचा युवा वेटलिफ्टिंगपटू संकेत सरगरने शनिवारी पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात रौप्यपदक कमावताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील भारताचे खाते उघडले.
  • संकेत सुवर्णपदकासाठी कडवा दावेदार मानला जात होता, परंतु क्लीन अँड जर्कमध्ये 139 किलो वजन उचलताना उजव्या हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
  • 21 वर्षांची चिन्हे एकूण वजन 248 kg (113 kg + 135 kg). उचलले.
  • तर फक्त एक किलोच्या फरकाने संकेतला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.

दिनविशेष :

  • 1658 मध्ये औरंगजेब मुघल सम्राट बनले.
  • हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म 31 जुलै 1880 मध्ये झाला.
  • रेंजर 7 अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्र 31 जुलै 1964 मध्ये काढले.
  • सतार वादक पं. रविशंकर यांना 1992 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान झाला.

 


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.