चालू घडामोडी (१५ जून २०२२)
‘अग्निपथ योजने’ची संरक्षण मंत्र्याकडून घोषणा :
- भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे.
- तर या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’असे नाव देण्यात आले आहे.
- दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली होती.
- तसेच लष्करी व्यवहार विभाग त्याची अंमलबजावणी करत आहे.
- तर चार वर्षांनंतर, या योजनेंतर्गत भरती झालेल्या 80 टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार आहे.
- उरलेल्या 20 टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याच पुन्हा संधी मिळणार आहे.
- सध्या भारतीय सशस्त्र दलाचे सरासरी वय 32 वर्षे आहे. ही योजना लागू झाल्यानंतर ही योजना 24 ते 26 वर्षांची असेल.
केंद्राकडून दीड वर्षांत 10 लाख नोकऱ्या :
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध केंद्र सरकारी विभाग आणि मंत्रालयांना आगामी दीड वर्षांत दहा लाख नोकरभरती करण्याची सूचना दिली आहे.
- मोहिमेप्रमाणे ही भरतीप्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- पंतप्रधान कार्यालयातर्फे मंगळवारी ही माहिती देण्यात आली.
- पंतप्रधान कार्यालयाने सर्व सरकारी विभाग व मंत्रालयातील मनुष्यबळाचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी या सूचना दिल्या.
- सरकारच्या अनेक विभागांत रिक्त असलेल्या पदांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे.
भारत हा जगातील दुसरा सर्वात प्रदूषित देश :
- येत्या काळात वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुर्मान पाच वर्षांनी कमी होण्याची शक्यता आहे.
- शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने (ईपीआयसी) यासंदर्भात एक अहवाल जारी केला आहे.
- तर या अहवालात म्हटले आहे की, नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात लोक मोठ्या प्रमाणात प्रदुषित भागांमध्ये राहतात.
- तसेच, गेल्या काही वर्षात भारताच्या वायू प्रदूषणाच्या पातळीचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार झाला असून हवेची गुणवत्ता लक्षणीय खराब झाली आहे.
- वायू प्रदूषण हा भारतातील मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे.
- दिल्ली हे भारतातील सर्वात जास्त प्रदुषित राज्य आहे. जागतिक स्तरावर भारत हा जगातील दुसरा सर्वात प्रदूषित देश आहे.
- भारतात 2020 साली खराब हवेमुळे नागरिकांचे आयुर्मान 6.9 वर्षांनी कमी झाले.
भारतीय संघ आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र :
- पॅलेस्टाइनने ‘ब’ गटातील सामन्यांत फिलिपिन्सला 4-0 अशा फरकाने पराभूत केल्याने भारतीय पुरुष फुटबॉल संघटना मंगळवारी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला.
- तर या विजयामुळे पॅलेस्टाइनने गटात अग्रस्थान मिळवत 24 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला, तर फिलिपिन्स चार गुणांसह दुसरे स्थान मिळवूनही अपात्र ठरला.
- भारत प्रथमच सलग दुसऱ्यांदा आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
- 2019 मध्ये भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते.
भारताचा ‘गोल्डन बॉय’मैदानावर उतरण्यास सज्ज :
- भारताचा ऑलिम्पिक हिरो नीरज चोप्रा या आठवड्यात पुन्हा एकदा मैदानावर उतरण्यासाठी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
- फिनलंडमध्ये होणाऱ्या पावो नुर्मी गेम्स 2022 या स्पर्धेमध्ये तो भाग घेणार आहे.
- टोक्यो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा असेल.
- युग फिनलंडमधील तुर्कू येथील पावो नूरमी स्टेडियममध्ये पावो नूरमी गेम्स 2022ची सुरुवात झाली.
- पावो नुरमी खेळ ही एकमेव स्पर्धा आहे जागतिक अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमधील दुसरी प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा आहे.
- तर डायमंड लीग पोवो नूरमी गेम्सचा क्रमांक लागतो.
माजी खेळाडू आणि पंचांसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय :
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या सर्व माजी क्रिकेटपटू आणि माजी पंचांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच ज्या आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंना आतापर्यंत 30 हजार रुपये मिळत होते, त्यांना आता 52 हजार 500 रुपये मिळणार आहेत.
- याशिवाय 2003 पूर्वी निवृत्त झालेल्या आणि 22 हजार 500 रुपये निवृत्ती वेतन मिळणाऱ्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना आता ४५ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे.
- इंडियन प्रीमियर लीगमधून मिळणारी कमाई भविष्यात खेळाडूंच्या सुविधा आणि गरजांवरही वापरली जाऊ शकते, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे.
दिनविशेष :
- १५ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय हवा दिन‘ आहे.
- वैद्यकीय इतिहासात प्रथमच डॉ. जॉन बॅप्टिस्ट डेनिस यांनी १५ जून १६६७ मध्ये यशस्वी रक्तसंक्रमण केले.
- १५ जून १८६९ मध्ये महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
- लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे ‘समाजसेवक अण्णा हजारे‘ यांचा जन्म १५ जून १९३७ रोजी झाला.
- b.p तुम्ही आहात 15 जून 1970 रोजी पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.