28 मे 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

गीतांजली श्री
गीतांजली श्री

चालू घडामोडी (२८ मे २०२२)

गीतांजली श्री यांच्या कादंबरीच्या अनुवादाला मानाचा पुरस्कार :

 • भारतीय भाषिक कादंबरीच्या अनुवादाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळण्याचा ऐतिहासिक क्षण गुरुवारी हिंदी लेखिका गीतांजली श्री यांच्या पुस्तकामुळे लाभला.
 • त्यांच्या ‘रेत समाधि’ या कादंबरीचा डेझी रॉकवेल यांनी केलेला ‘वाळूचे थडगे’ हा अनुवाद पुरस्कारासाठी निवडण्यात आला.
 • आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेले समकालीन पोलिश, दक्षिण कोरियाई आणि जपानी साहित्यिकही या पुरस्काराच्या स्पर्धेत होते.
 • समकालीन, आजच्या वगैरे परिस्थितीवर भाष्यबिष्य करण्याच्या फंदात अजिबात न पडता गोष्टीत रमवणारी अशी ही कादंबरी आहे.
 • बुकर पुरस्काराच्या दीर्घ यादीत ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’सह वेगवेगळय़ा 11 भाषांतून अनुवादीत 13 पुस्तकांचा समावेश होईल.
 • हा पुरस्कार 50 हजार ब्रिटिश पौंड इतक्या रकमेचा असतो. तो मूळ लेखिका आणि अनुवादकामध्ये विभागून देण्यात येतो.

चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धात प्रज्ञानंदला उपविजेतेपद :

 • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला झुंजार खेळानंतरही चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
 • अंतिम फेरीच्या दोन लढतींअंती असलेली बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी दोन डावांचा टायब्रेकर झाला आणि यात जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील डिंग लिरेनने प्रज्ञानंदला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली.
 • 16 वर्षीय प्रज्ञानंदने अंतिम फेरीतील पहिली लढत 1.5-2.5 अशा फरकाने गमावली होती.

उपकनिष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धात महाराष्ट्राची आर्या सर्वोत्तम उदयोन्मुख बॉक्सिंगपटू :

 • राष्ट्रीय उपकनिष्ठ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या गर्देला सर्वोत्तम उदयोन्मुख बॉक्सिंगपटूचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 • तर या स्पर्धेत आर्या आणि समीक्षा सोलंकी यांनी आपापल्या वजनी गटाच्या अंतिम फेरीत 5-0 असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे.
 • पुण्याच्या आर्याने स्पर्धेच्या अंतिम दिवशी 36 किलो वजनी गटात गोव्याच्या सगुण शिंदेचा, तर समीक्षाने 40 किलो गटात उत्तर प्रदेशच्या साधनाचा सहज पराभव केला.
 • कुमारी गटात हरयाणाने स्पर्धेत सात सुवर्णपदक पटकावली.
 • तसेच स्पर्धेत मणिपूरच्या जयश्री देवी आणि सेनादलच्या आकाश बधवारला सर्वोत्तम बॉक्सिंगपटू पुरस्कार मिळाला.

दिनविशेष :

 • क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 1883 मध्ये 28 रोजी झाला.
 • फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीची स्थापना 1937 मध्ये 28 मध्ये झाली.
 • 1952 मध्ये 28 रोजी ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
 • 75 व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे 1958 मध्ये 28 रोजी सत्कार करण्यात आला.
 • पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना 1964 मध्ये 28 रोजी झाली.

इतरांना शेअर करा .......

Leave a Comment