WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

9 मे 2022 चालू घडामोडी

इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (9 मे 2022)

जॉन ली यांची हाँगकाँगच्या नेतेपदी निवड :

  • हाँगकाँगमधील लोकशाहीवादी चळवळ दडपून टाकण्यासाठी प्रयत्न करणारे कट्टरवादी सुरक्षा प्रमुख जॉन ली यांची रविवारी प्रामुख्याने चीनधार्जिण्या समितीने केलेल्या मतदानात शहराचा यापुढील नेता म्हणून निवड करण्यात आली.
  • तर या निवडणुकीतील एकमेव उमेदवार असलेल्या ली यांनी झालेल्या मतदानापैकी 99 टक्क्यांहून अधिक मते मिळवून ही निवडणूक जिंकली.
  • मतदार असलेल्या सर्व, म्हणजे 1500 समिती सदस्यांची बीजिंगमधील मध्यवर्ती सरकारने काळजीपूर्वक छाननी केली होती.
  • ली हे 1 जुलै रोजी सध्याच्या नेत्या कॅरी लाम यांची जागा घेतील.

अफगाणी महिलांसाठी तालिबानचा नवा आदेश :

  • उपासमार आणि आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानने महिलांसाठी नवा आदेश जारी केला आहे.
  • अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना डोक्यापासून पायापर्यंत बुरखा घालण्याचा आदेश देण्यात आला आहे.
  • एवढंच नाही तर या बुरख्यातून महिलांचे डोळेही दिसता कामा नयेअसे आदेशात म्हटले आहे.
  • धर्मांध इस्लामवाद्यांनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यापासून महिलांवर लादण्यात आलेल्या नियमांपैकी हा सर्वात कठोर नियम आहे.
  • तर काही दिवसांपूर्वीच तालिबानने महिलांना वाहन परवाना देण्यावरही बंदी घातली आहे.

महिला ‘आयपीएल’ची घोषणा :

  • भारताने 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली.
  • त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला.
  • तसेच गेली काही वर्षे प्रायोगिक स्तरावर महिला ट्वेन्टी-20 चॅलेंज स्पर्धा घेणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील वर्षीपासून महिला ‘आयपीएल’ची घोषणा केली आहे.
  • तर यात सहा-सात संघ अपेक्षित आहेत.

चेल्सी क्लबची मालकी लॉस एंजेलिस डॉजर्सकडे :

  • प्रीमियर लीग फुटबॉलमधील चेल्सी क्लबची मालकी तीन अब्ज डॉलर रकमेला लॉस एंजेलिस डॉजर्स मिळवली आहे.
  • तर टॉड बोएहली हे या कंपनीचे भागधारक आहेत.
  • युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे रशियाच्या रोमन अब्रामोविच यांच्या निर्बंध लादण्यात आल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव क्लबची मालकी सोडावी लागली.
  • ‘फिफा’ क्लब विश्वचषक विजेत्या आणि 2021 मधील युरोपियन विजेत्या संघाची विक्री 2.5 अब्ज पौंडला करण्यात आली आहे.
  • तर जागतिक संघविक्रीमधील हा विक्रमी आकडा मानला जातो.
  • प्रीमियर लीगने चेल्सीच्या नव्या मालकी कराराला मंजुरी देण्याची आणि सरकारने त्यांचा व्यवसाय करार 31 मेपर्यंत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे.

साऊंड रनिंग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम :

  • भारताचा आघाडीचा धावपटू अविनाश साबळेने कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे सुरू असलेल्या साऊंड रनिंग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत 30 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
  • 3000 मीटर स्टीपलचेसमधील राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या साबळेने या शर्यतीत 13 मिनिटे आणि 25.65 सेकंद वेळेची नोंद केली.
  • परंतु त्याला 12व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
  • साबळे अमेरिकेच्या यूजीनमध्ये 15 ते 24 जुलै दरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील साबळेने बहादूर प्रसाद यांचा 13 मिनिटे, 29.70 सेकंदांचा विक्रम
  • तर हा विक्रम त्यांनी 1992 मध्ये बर्मिगहॅम येथे नोंदवला होता.

दिनविशेष :

  • मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्राम 1874 मध्ये 9 मध्ये सुरू झाल्या.
  • 1936 मध्ये 9 मध्ये इटलीने इथिओपिया देश बळकावला.
  • पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे 1955 मध्ये 9 मध्ये प्रवेश.
  • मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा 1540 मध्ये 9 मध्ये जन्म.

इतरांना शेअर करा .......

Latest Post

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.