महाराष्ट्राची माती कविता प्रा.विश्वास पडोळसे | MAHARASHTRACHI MATI KAVITA VISHWAS PADOLASE

आकाश कवेत घेण्यासाठी
पंखांमध्ये बळ दे
अंगावरच्या घामाला
कर्तृत्वाचे फळ दे.. डोळ्यात दे स्वप्ननवे
साकारायला हात दे
अंधार भेदायला थोडं
तेल आणि वात दे…
माणुसपण जोडण्यासाठी
हृदयात थोडी प्रित दे!
ओले डोळे पुसण्यासाठी
जीवा भावाचा मित दे!
जगण्यासाठी माणुस म्हणुन
थोडं मला भान दे!
दयाधना परमेश्वरा
आनखी एक वान दे
आईचे ऋण फेडण्यासाठी
हृदयात एक पेटी दे
जपुन ठेवण्यासाठी त्यात
महाराष्ट्राची माती दे……..
लेखक:- प्रा. विश्वास पाडोळसे