WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

11 जून 2022 चालू घडामोडी

इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (११ जून २०२२)

जाहिरातींबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे :

 • मुलांना लक्ष्य करून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
 • मुलांचे आरोग्य आणि पोषण यासंबंधी लाभांचे खोटे दावे करण्याच्या प्रकाराला आळा घालणे आणि त्यांना भेटवस्तूचे प्रलोभन दाखवून वस्तू आणि सेवा घेण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रकाराला प्रतिबंध करण्याची यामध्ये तरतूद आहे.
 • ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रतिबंध आणि जाहिरातींसंबंधी आवश्यक सतर्कतेसाठी यंदा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
 • मुलांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींसंबंधी 19 तरतूदी आहेत. त्या तातडीने लागू करण्यात आल्या आहेत.
 • ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहितकुमार सिंग यांनी याबाबत माहिती दिली.

आदिवासी भागाच्या विकासासाठी योजनांचा प्रारंभ :

 • गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागातील खुदवेल गावात ‘गुजरात गौरव अभियान’ सभेत ते बोलत होते.
 • तर यावेळी मोदींनी आदिवासी भागाच्या विकासासाठी तीन हजार 50 कोटींच्या योजनांचा प्रारंभ केला.
 • गुजरातमधील माझ्या ‘मुख्यमंत्री अमृतम योजना’च्या धर्तीवर केंद्रात ‘आयुष्मान भारत योजना’ सुरू केली.
 • तर या अंतर्गत गरिबांना उपचारांसाठी पाच लाखांची मदत मिळते.

वरिष्ठ राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धा:

 • महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने वरिष्ठ राष्ट्रीय आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक कमावले, तर प्राजक्ता गोडबोलेने रौप्यपदक पटकावले.
 • 25 वर्षीय संजीवनीने ३३:१६.४३ सेकंद, तर प्राजक्ताने ३३:५९.३४ सेकंद अशी वेळ नोंदवली.
 • एप्रिल महिन्यात झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवताना यापेक्षा तीन सेकंदांनी उत्तम अशी अशी वेळ गाठली होती.
 • मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रतेची 31 मिनिटांची वेळ नोंदवण्यात ती अपयशी ठरली आहे.

दुखापतीमुळे मेरीची राष्ट्रकुल स्पर्धातून माघार :

 • भारताची अनुभवी बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोमने पायाला झालेल्या दुखापतीमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे.
 • सहा वेळा विश्वविजेत्या मेरीला दुखापतीमुळे निवड चाचणी स्पर्धेतील ४८48 किलो वजनी गटातील उपांत्य सामना अर्धवट सोडावा लागला.
 • त्यामुळे हरयाणाच्या नितूला अंतिम फेरीसाठी पुढे चाल देण्यात आली.
 • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चालू असलेल्या निवड चाचणी स्पर्धेत 39 वर्षीय मेरीच्या डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे तिला खेळताना समतोल साधणे कठीण गेले.
 • मग हा सामना थांबवून सामनाधिकाऱ्यांनी नितुला विजयी घोषित केले केले.

दिनविशेष :

 • मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात सन 1665 मध्ये 11 जून रोजी पुरंदरचा तह झाला.
 • 11 जून 1895 मध्ये पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.
 • एडविन आर्मस्ट्राँग यांनी 11 जून 1935 रोजी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

इतरांना शेअर करा .......

Latest Post

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.