18 जून 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (जून १८, २०२२)

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी VPN आणि क्लाऊड सर्व्हिस वापरावर बंदी :

 • केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स (VPN)विविध कंपन्यांच्या क्लाऊड सर्व्हिसेस वापरण्यावर बंदी घातली आहे.
 • तर यात नॉर्ड व्हीपीएन (Nord VPN), एक्स्प्रेस व्हीपीएन, टॉरसारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे.
 • तसेच या सर्वांना इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) भारतातील व्हीपीएन वापराबाबत निर्देश दिले.
 • तर या नंतर या सर्व कंपन्यांनी भारतात सेवा देणे थांबवा करत असल्याचं सांगितलं. यानंतर लगेचच सरकारने हा निर्णय घेतलाय.
 • देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (NIC) सायबर सुरक्षेचा विचार करून काही मार्गदर्शक सूचना दिल्याचं सांगितलं आहे.
 • यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारचे अंतर्गत आणि गुप्त कागदपत्रे गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्ससारख्या गैरसरकारी क्लाऊड सर्व्हिसेसवर अपलोड करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

‘अग्निपथ’ योजना: हवाई दलात भरती प्रक्रियेला होणार सुरुवात :

 • लष्करातील ‘अग्नीचा मार्ग’ या नव्या भरती योजनेबाबत देशभरात संतापाचे वातावरण आहे.
 • केंद्र सरकारच्या या नव्या योजनेला सर्वात मोठा विरोध बिहारमध्ये होत आहे.
 • दरम्यान, लष्कराच्या या नव्या योजनेबाबत एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे.
 • एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी म्हणाले की, हवाई दलातील भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होणार आहे.
 • तर ते म्हणाले की, भारत सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत सशस्त्र दलात तरुणांची भरती केली जाऊ शकते.
 • तसेच या योजनेत भरतीचे वय 17.5 वर्षे ते 21 वर्षे ठेवण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, मला कळविण्यात आनंद होत आहे की, पहिल्या भरतीसाठी तरुणांची कमाल वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे.

रस्त्यावर गाडी उभी करणाऱ्यांसाठी नवा कायदा :

 • केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवणाऱ्याला 500 रु देण्यासंबंधी नवा कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे.
 • दिल्लीमध्ये आयोजित इंडस्ट्रियल डेकार्बोनायझेशन समिटमध्ये ते बोलत होते.
 • तर यावेळी बोलताना त्यांनी पार्किंग ही फार मोठी समस्या असल्याचं सांगितलं. दरम्यान नितीन गडकरी यांनी केलेलं हे वक्तव्य उपहासात्मकपणे होतं की खरंच गांभीर्याने विचार सुरु आहे याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही.

भारत-द. आफ्रिका ट्वेन्टी-20 मालिकेत बरोबरी :

 • अनुभवी दिनेश कार्तिकच्या अप्रतिम अर्धशतकानंतर आवेश खानने केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारताने चौथ्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 82 धावांनी मात केली.
 • तर या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली असून निर्णायक सामना रविवारी खेळवला जाईल.
 • शुक्रवारी राजकोट येथे झालेल्या सामन्यात भारताने केलेल्या 170 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा डाव `16.5 षटकांत 87 धावांतच आटोपला.

दिनविशेष :

 • स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म १८ जून १८९९ मध्ये झाला.
 • पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म 18 जून 1911 रोजी झाला.
 • सन 1908 मध्ये 18 जून रोजी फिलीपिन्स विद्यापीठ मध्ये स्थापना झाली
 • राम मनोहर लोहिया यांनी डॉ यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून १८ जून १९४६ गोवा मुक्तीची शिंगे रोज फुंकली जात होती.
 • जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस १८ जून १९८१ मध्ये विकसित केली गेली.

इतरांना शेअर करा .......

Leave a Comment