14 मे 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

एलोन मस्क
एलोन मस्क

चालू घडामोडी (१४ मे २०२२)

मस्क यांच्याकडून ‘ट्विटर’ खरेदी करार तात्पुरता स्थगित :

  • प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ खरेदी करार तात्पुरता स्थगित केल्याचे ‘ट्विट’ करून शुक्रवारी सर्वाना धक्का दिला.
  • ‘ट्विटर’वर सध्या असलेल्या ‘स्पॅम’ आणि बनावट खात्यांची तपशीलवार माहिती अद्याप ‘ट्विटर’कडून आपल्याला मिळाली नसल्याने हा खरेदी करार स्थगित केल्याचे मस्क यांनी नमूद केले.
  • तर ‘ट्विटर’ने गुरुवारी दोन शीर्षस्थ व्यवस्थापकांना कार्यमुक्त केले होते.
  • मस्क यांच्या नियोजित ‘ट्विटर’ खरेदीमुळे या कंपनीत गोंधळाचे वातावरण आहे.
  • त्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी ही नवी घोषणा केल्याने या प्रकरणाला अनपेक्षित नवेच वळण मिळाले.

NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली :

  • NEET परीक्षा 2022 (NEET-PG 2022) पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
  • परीक्षा आयोजित करण्यात येणाऱ्या विलंबामुळे निवासी डॉक्टरांची संख्या कमी होईल. असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
  • तर ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी काही वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या गटाने केली होती.
  • तसेच परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांकडून आंदोलनही करण्यात येत आहे.

कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांना चार सुवर्ण :

  • भारतीय नेमबाजांनी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतील दमदार कामगिरी सुरू ठेवताना शुक्रवारी चार सुवर्णपदकांची कमाई केली.
  • पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या सांघिक गटात रुद्राक्ष पाटील, पार्थ मखिजा आणि उमामहेश माद्दिनेनी यांनी, तर 10
  • मीटर एअर पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरी, शिवा नरवाल आणि सरबजोत सिंग या त्रिकुटाने सुवर्णपदक जिंकले.
  • महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकर, पलक आणि ईशा सिंग यांनी, तर महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आर्या बोरसे, झीना खिट्टा आणि रमिता यांनी सुवर्णपदक आपल्या नावे केले.

दिनविशेष :

  • 1940 मध्ये 14 मध्ये दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
  • एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा 1960 मध्ये 14 मध्ये सुरू झाली.
  • कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात 1963 मध्ये 14 मध्ये प्रवेश.
  • 1657 मध्ये 14 मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment