विशेषण व त्याचे प्रकार

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

Contents show

विशेषण व त्याचे प्रकार

विशेषण :-

नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्‍या शब्दास विशेषण असे म्हणतात.

उदा.

 • चांगली मुले
 • काळा कुत्रा
 • पाच टोप्या

विशेषण चांगली, काळा, पाच

विशेष्य पिशवी, कुत्रा, टोप्या

विशेषणाचे प्रकार :-

 • गुणवाचक विशेषण
 • संख्यावाचक विशेषण
 • सार्वनामिक विशेषण

1. गुणवाचक विशेषण :-

नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात.

उदा.

 • हिरवे रान
 • शुभ्र ससा
 • निळे आकाश

2. संख्यावाचक विशेषण :-

ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास “संख्यावाचक विशेषण” असे म्हणतात.

संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.

 • गणना वाचक संख्या विशेषण
 • अनुक्रमांक विशेषण
 • आवृत्ती वाचक संख्या विशेषण
 • पृथ्वी क्रमांक विशेषण
 • अनिश्चित संख्या विशेषण

1. गणना वाचक संख्या विशेषण :-

ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात

उदा.

 • दहा मुले
 • तुमची भाषा
 • एक तास
 • पन्नास रुपये

गणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात

१. पूर्णांक वाचक पाच, सहा, अठरा, बारा.

2. अपूर्णाक वाचक पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.

3. साकल्य वाचक पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.

2. क्रमवाचक संख्या विशेषण :-

वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा.

 • पहिले दुकान
 • सातवा बंगला
 • पाचवे वर्ष

3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण :-

वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शविते त्यास आवृत्ती वाचक विशेषण असे म्हणतात.

उदा.

 • तिप्पट मुले
 • दुप्पट रस्ता
 • दुहेरी रंग

4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :-

जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक विशेषण असे म्हणतात.

उदा.

 • मुलींनी पाच-पाच चा गट करा
 • प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा

5. अनिश्चित संख्या विशेषण :-

ज्या विशेषणाव्दारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा.

 • काही मुले
 • थोडी जागा
 • भरपूर पाणी

3. सार्वनामिक विशेषण :-

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.

उदा.

 • हे झाड
 • ती मुलगी
 • त्यामुळे पक्षी
मी, तू, तर, हा, कोण, कोण, काय ही सर्वनामे अशावेळी नेहमीच मूळ स्वरुपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो.
 • मी माझा, माझी,
 • तू तुझा, तो-त्याचा
 • आम्ही आमचा, तुम्ही-तुमचा, ती-तिचा
 • हा असा, असला, इतका, एवढा, अमका
 • तो तसा, तसला, तितका, तेवढा, तमका
 • जो जसा, जसला, जितका, जेवढा
 • कोण कोणता, केवढा

हे पण वाचा :- सर्वनाम व त्याचे प्रकार


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.