2 जून 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (२ जून २०२२)

अयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिर गाभाऱ्याचं भूमिपूजन :

 • अयोध्येत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिराच्या गाभाऱ्याचं भूमिपूजन होत आहे.
 • गाभाऱ्याच्या पहिल्या शिळेचं मंत्रोच्चारासह योगींच्या हस्ते पूजन करण्यात आलं.
 • तर या भूमिपूजनासह मंदिराच्या निर्मितीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
 • पहिल्या टप्प्यात मंदिराच्या चबुतऱ्याचं बांधकाम करण्यात आलं.
 • या गाभाऱ्याचं काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे.
 • तसेच 2024 मधील मकरसंक्रातीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

वस्तू व सेवा कर संकलनात घट :

 • राज्यासह देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात मे महिन्यात घट नोंदविण्यात आली़.
 • राज्यात मे महिन्यात 20,313 कोटींचे संकलन झाले असून, एप्रिलच्या तुलनेत ते 25 टक्के कमी आह़े.
 • देशात या महिन्यात जीएसटी संकलनाने 1.40 लाख कोटींच्या पुढे मजल मारली असली तरी एप्रिलच्या तुलनेत त्यात 16 टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आह़े
 • देशात चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाने नवा विक्रम करत प्रथमच दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धात आनंदचा लॅग्रेव्हवर विजय :

 • भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने मंगळवारी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पारंपरिक (क्लासिकल) विभागातील पहिल्या फेरीत मॅक्झिमे वाशिये-लॅग्रेव्हला 40 चालींत पराभूत केले.
 • भारतीय ग्रँडमास्टर आनंदने या विजयाद्वारे तीन गुणाची कमाई केली.
 • याचप्रमाणे अमेरिकेच्या वेस्टली सो याने तैमूर राजाबोव्हला नमवून आनंदसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले आहे.
 • पारंपरिक स्पर्धेआधी खेळवण्यात आलेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकारात आनंदने सातव्या फेरीत कार्लसनवर विजय मिळवून चौथा क्रमांक मिळवला.

आशिया चषक हॉकी स्पर्धात भारताला कांस्यपदक :

 • युवकांचा समावेश असलेल्या भारताच्या पुरुष संघाने बुधवारी दिमाखदार कामगिरी करीत जपानला 1-0 असे नमवून आशिया चषक हॉकी स्पर्धेचे कांस्यपदक पटकावले.
 • ‘अव्वल-4’ फेरीच्या मंगळवारी झालेल्या अखेरच्या लढतीत दक्षिण कोरियाने 4-4 असे बरोबरीत रोखल्यामुळे भारताला जेतेपद टिकवण्यात अपयश आले.
 • परंतु जपानविरुद्धच्या लढतीत राजकुमार पाळणा सातव्या मिनिटाला झळकावलेला एकमेव मैदानी गोल निर्णायक ठरला.
 • त्यानंतर उर्वरित सामन्यात भारतीय बचावपटूंनी प्रतिस्पध्र्याना गोल करण्याची कोणतीच संधी दिली नाही.

इंग्लंडच्या सर्वात वयस्कर माजी कसोटीपटूचे निधन :

 • ससेक्स आणि इंग्लंडचे माजी यष्टिरक्षक फलंदाज जिम पार्क्स यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले आहे.
 • तर ते इंग्लंडचे सर्वात वयस्कर आणि हयात असलेले कसोटी क्रिकेटपटू होते.
 • त्यांचे वडील, जिम सिनिअर आणि त्याचे काका होरेस दोघेही ससेक्स क्रिकेट क्लबसाठी 400 पेक्षा जास्त वेळा खेळले होते.
 • तसेच सुरुवातीला डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणारे पार्क्स नंतर फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून नावारुपाला आले.
 • पार्क्सने यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजाराहून अधिक वेळा यष्टीमागे खेळाडूंना बाद केले आहे.
 • पार्क्स यांनी 1954 ते 1968 या कालावधी दरम्यान 46 कसोटी सामने खेळले होते. त्यानंतरची आणखी वर्षे त्यांनी काउंटी क्रिकेट खेळले.
 • क्रिकटमधून निवृत्त झाल्यानंतर पार्क्स यांनी ब्रुअर व्हिटब्रेडसाठी आणि ससेक्स क्रिकेट क्लबचे विपणन व्यवस्थापक म्हणून काम केले.

दिनविशेष :

 • कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस 2 जून 1800 मध्ये देण्यात आली.
 • इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्म २ जून १९५५ रोजी झाला.
 • लेखिका अमृता प्रीतम यांना 2 जून 2000 मध्ये दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर झाला.
 • 2 जून 2014 रोजी तेलंगण भारताचे 29वे राज्य झाले.

 


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment