1 जून 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (१ जून २०२२)

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धात आनंदचा कार्लसनवर विजय :

 • भारताचा आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या अतिजलद (ब्लिड्झ) स्पर्धाप्रकारातील सातव्या फेरीत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनवर दिमाखदार विजय मिळवला.
 • मात्र तरीही स्पर्धेअखेरीस त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 • आनंदने अनिश गिरी (नेदरलँड्स) आणि मॅक्सिम वॅचिअर-लॅग्रेव्ह (फ्रान्स) यांच्याकडून अनुक्रमे चौथ्या आणि नवव्या फेरीत पराभव पत्करला.
 • परंतु 10 बुद्धिबळपटूंचा समावेश असलेल्या अतिजलद स्पर्धेत आनंदला 5 गुण मिळवता आले.
 • काही दिवसांपूर्वी भारताचा युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदनेही अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला हरवण्याची किमया साधली होती.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात भारताच्या महिला रायफल संघाला सुवर्णपदक :

 • ईलाव्हेनिल वालारिवान, रमिता आणि श्रेया अग्रवाल यांनी अजरबैजानमधील बाकू येथे सुरू असलेल्या ‘ISSF’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात सुवर्णपदक मिळवत भारताच्या पदकांचे खाते उघडले.
 • सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय महिला त्रिकुटाने डेन्मार्कच्या अ‍ॅना निलसन, एमा कूच आणि रिकी माएंग इब्सनला 17-5 असे नमवले.
 • पोलंडला या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • माजी अग्रमानांकित व्हालारिवान, रमिता आणि श्रेया यांनी सोमवारी दोन टप्प्यांच्या पात्रता फेरीतून अंतिम फेरीत धडक मारली होती.
 • भारतीय महिलांनी पहिल्या टप्प्याच्या पात्रता फेरीत 90 फैरींमध्ये 944.4 गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले.

आशिया चषक हॉकी स्पर्धात भारत अंतिम फेरी गाठण्यात अपयशी :

 • दक्षिण कोरियाविरुद्धच्या ‘अव्वल-4’ फेरीतील सामन्यात भारताच्या युवा हॉकी संघाने प्रभावी आणि वेगवान खेळ दाखवला.
 • परंतु विजयाऐवजी 4-4 अशी बरोबरी पत्करल्यामुळे मंगळवारी गतविजेता भारतीय संघ आशिया चषक हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला.
 • मलेशियाने जपानला 5-0 असे हरवल्यामुळे भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी विजयाची आवश्यकता होती.
 • ‘अव्वल-4’ फेरीअखेरीस भारत, मलेशिया आणि कोरिया या तिन्ही संघांच्या खात्यावर प्रत्येकी पाच गुण जमा होते.

दिनविशेष :

 • १ जून जागतिक दुध दिन
 • पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1 जून 1842 रोजी झाला.
 • फिंगरप्रिंटिंगचे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म 1 जून 1843 मध्ये झाला.
 • विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे 1 जून 1929 मध्ये स्थापना केली.
 • मुंबई व पुणे दरम्यान, डेक्कन क्वीन ही ट्रेन आहे 1 जून 1930 रोजी सुरू झाली.
 • 1 जून 1945 रोजी टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) प्रतिष्ठापन केले आहे.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.