7 जून 2022 चालू घडामोडी

इतरांना शेअर करा .......

 

वंदे भारत

चालू घडामोडी (७ जून २०२२)

नरेंद्र मोदींच्या हस्ते खास नाण्यांचे प्रकाशन :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक, दोन पाच, दहा आणि वीस रुपयांच्या नाण्यांची खास मालिका जारी केली आहे.
  • तर ही नाणी सामान्य नाण्यांपेक्षा विशेष असतील असणार आहेत.
  • कारण ही नाणी किती रुपयांची आहेत हे अंध व्यक्तींनादेखील ओळखता येणार आहेत.
  • दिल्ली येथील अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आयकॉनिक विक या साप्ताहिक कार्यक्रमाचे यायोजन करण्यात आले आहे.
  • तर या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोदी यांनी वरील खास नाणी सार्वजनिक केली.
  • मोदी यांच्या हस्ते जारी करण्यात आलेल्या या विशेष नाण्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत.
  • या नाण्यांवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’चा (AKAM) लोगो असेल.

दोन नव्या ‘वंदे भारत’ 15 ऑगस्टनंतरच :

  • ‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस येत्या 15 ऑगस्टला रेल्वेच्या चेन्नईमधील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’तून (आयसीएफ) बाहेर पडणार आहे.
  • तर या कारखान्यातून सुरुवातीला दोन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा प्रवास सुरू होणार आहे.
  • त्यामुळे येत्या 15 ऑगस्टनंतरच ही गाडी धावू शकेल. या दोन प्रोटोटाईप गाडय़ा असतील.
  • महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही महिन्यात ‘वंदे भारत’ गाडय़ांच्या डब्यांची बांधणी लातूर येथील कारखान्यातही होणार आहे.
  • जवळपास 400 वातानुकूलित ‘वंदे भारत’ गाडय़ांची बांधणी करण्यात येणार आहे.
  • जीपीएस आधारित ऑडिओ व्हिजुअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असतील. प्रत्येक ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये 16 वातानुकूलित डबे असणार आहेत.
  • तर एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ इतकी आहे.

बंगालमधील विद्यापीठांच्या कुलपतीपदी मुख्यमंत्री :

  • पश्चिम बंगालमधील सर्व शासन संचालित विद्यापीठांच्या कुलपती पदावरून राज्यपाल जगदीप धनखर यांना हटवून त्यांच्या जागी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कुलपती बनवण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली.
  • याशिवाय, खासगी विद्यापीठांच्या अभ्यागत पदावरून राज्यपालांना हटवून त्यांच्या जागी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना आणण्याच्या आणखी एक प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • कृषी व आरोग्य विद्यापीठांसह राज्यातील सर्व शासन संचालित विद्यापीठांच्या कुलपतीपदी मुख्यमंत्र्यांना नेमण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
  • विधानसभेच्या अधिवेशनात हा प्रस्ताव विधेयकाच्या स्वरूपात मांडण्यात येणार आहे.

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धात पूजा, विवानला सुवर्ण :

  • महाराष्ट्राने खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सायकिलग आणि योगासनात सुवर्णपदके पटकावली.
  • याचप्रमाणे वेटलिफ्टिंगमध्येही कांस्य पदक मिळवले.
  • महाराष्ट्राने 2 सुवर्ण, 6 रौप्य व 5 कांस्य अशी पदके पटकावली.
  • ट्रॅक सायकिलगमध्ये परसूट प्रकारात मुलींमध्ये पूजा दानोलने सुवर्णपदक पटकावले याच प्रकारात मुलांमध्ये विवान सप्रूने (मुंबई) कांस्य मिळवले.
  • स्प्रिंटमध्ये संज्ञा कोकाटेने रौप्यपदक जिंकले.

अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रम आठव्यांदा मोडला :

  • भारताच्या अविनाश साबळेने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात पाचवा क्रमांक मिळवला.
  • तसेच स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम आठव्यांदा मोडण्याची किमया साधली.
  • सेनादलात कार्यरत असलेल्या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील 27 वर्षीय अविनाशने 8:12.48 सेकंद अशी वेळ रविवारी नोंदवली.
  • टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मोरोक्कोच्या सौफीयानी एल बक्कालीने ही शर्यत जिंकली.

दिनविशेष :

  • महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ ७ जून १८९३ मध्ये सुरू केली होती.
  • ७ जून १९७५ मध्ये क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली.
  • आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी ७ जून १९९४ रोजी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.

इतरांना शेअर करा .......

Leave a Comment