8 जून 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

 

जागतिक महासागर दिन

चालू घडामोडी (८ जून २०२२)

केंद्र सरकारकडून सीडीएस नियुक्ती नियमांत मोठे बदल :

  • केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) या पदावरील नियुक्तीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.
  • सीडीएस पदासाठी पात्र अधिकार्‍यांची व्याप्ती वाढवत, संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
  • त्यानुसार आता नौदल आणि हवाई दलात सेवा करणारे लेफ्टनंट जनरल किंवा त्यांच्या समकक्ष पदावरील अधिकारी देखील सीडीएस पदासाठी पात्र ठरणार आहेत.
  • संरक्षण मंत्रालयाने वायू दल कायदा 1950 च्या कलम 190 मधील एअरफोर्स रेग्युलेशन 1964 मध्ये देखील सुधारणा केली आहे.
  • पात्रतेच्या निकषांमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे नुकतेच निवृत्त झालेले लष्करप्रमुख आणि उपप्रमुखही या पदासाठी पात्र असणार आहेत.

पोस्टाद्वारे निर्यात होणाऱ्या वस्तूंवर वजनानुसारच शुल्कआकारणी :

  • पोस्टाद्वारे निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क हे आकारमानाऐवजी पूर्वीप्रमाणे वजनावर निश्चित करण्याचा निर्णय केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने घेतला आहे.
  • तर या निर्णयामुळे पारंपारिक वाद्यनिर्मिती करणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
  • भारतीय पोस्ट सेवेद्वारे विविध वस्तूंची बाहेरील देशांमध्ये नियमितपणे निर्यात होत असते.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारताचे मोठे पाऊल :

  • भारतीय संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी आणि परकीय खर्चात लक्षणीय घट करण्याच्या उद्देशाने, संरक्षण संपादन परिषदने (डीएसी) भारतीय नौदलासाठी आठ नेक्स्ट जनरेशन कॉर्वेट्स, लढाऊ वाहने आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • भारतीय लष्करासाठी पूल बांधणारे टॅंक आणि भारतीय वायुसेनेच्या Su-30 MKI लढाऊ विमानांसाठी एरो-इंजिनच्या निर्मितीलाही मंजुरी देण्यात आली आहे.
  • संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सशस्त्र दलांच्या 76,390 कोटी रुपयांच्या भांडवली संपादनाच्या प्रस्तावांना डीएसीने बाय इंडियन आणि बाय अँड मेक इंडियन कॅटेगरी अंतर्गत मान्यता दिली आहे.
  • डीएसीने भारतीय सैन्यासाठी रफ टेरेन फोर्क लिफ्ट ट्रक्स, ब्रिज लेइंग टाक्या, स्वदेशी स्त्रोतांद्वारे अँटी-टंकर मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि शस्त्र शोध रडारसह आर्मर्ड कॉम्बॅट व्हेइकल्स खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • तसेच डीएसीने भारतीय नौदलासाठी 36,000 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चात नेक्स्ट जनरेशन कॉर्वेट्स (एनजीसी) खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
  • भारतीय नौदलाच्या नवीन इन-हाऊस रचनेवर आधारित जहाजबांधणीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एनजीसीची निर्मिती केली जाईल.
  • डिजीटल कोस्ट गार्ड प्रकल्पाला डीएसीने बाय इंडियन श्रेणी अंतर्गत संरक्षण क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनासाठी सरकारच्या दृष्टीकोनातून मान्यता दिली आहे.

कबड्डीत महाराष्ट्राच्या मुलींचे रूपेरी यश :

  • हरियाणातील पंचकुला येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
  • तर या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.
  • सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये कबड्डीच्या मैदानावर महाराष्ट्राच्या मुलींनी रौप्य पदकाची कमाई केली.
  • याशिवाय, मुलांच्या कबड्डी संघानेही कास्य पदकाची कमाई केली आहे.

दिनविशेष :

  • 8 जून हा दिवस जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन तसेच जागतिक महासागर दिन आहे.
  • लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ‘गीता रहस्य’ या ग्रंथाचे ८ जून १९१५ मध्ये गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले.
  • ८ जून १९१८ रोजी नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध लागला.
  • एअर इंडिया ची ८ जून १९४८ मध्ये मुंबई-लंडन विमानसेवा सुरू झाली.
  • पहिल्यांदा जागतिक महासागर दिन ८ जून १९९२ रोजी साजरा केला.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.