20 जून 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (२० जून २०२२)

कोकण रेल्वे विद्युतीकरणाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण :

  • कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा राष्ट्रार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे होणार आह़े
  • या रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, मडगाव आणि उडपी या तीन स्थानकांवर दुपारी 2.45 वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे.
  • ‘भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण मिशन – शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल’ या योजनेअंतर्गत लोकांना पर्यावरणपूरक, हरित आणि स्वच्छ वाहतुकीचे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी देशातील संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • यामध्ये कोकण रेल्वेच्या 741 किलोमीटर लांबीच्या मार्गाचा समावेश आहे.
  • त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील मार्ग 382 किलोमीटर, गोवा 163 किमी, तर कर्नाटकातील मार्ग 294 किलोमीटर आहे.

‘अग्निपथ’भरती प्रक्रियेबाबत तिन्ही दलांची घोषणा :

  • देशभर हिंसक विरोध झालेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला.
  • त्याचबरोबर, ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारे बंद असतील असा इशाराही दिला.
  • ‘अग्निपथ’मध्ये भरती होताना अर्जदार तरुणांना, या योजनेच्या विरोधातील जाळपोळीत सामील नसल्याचे किंवा आंदोलनात भाग घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.
  • तसेच प्रत्येक उमेदवाराची पोलीस पडताळणी करण्यात येईल.
  • एखाद्याविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल असेल, तर त्याला भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असेही लेफ्टनंट जनरल पुरी यांनी नमूद केले.

अग्निवीरांना निमलष्करी दलांत 10 टक्के आरक्षण :

  • ‘अग्निपथ’ या अल्पकालीन सैन्यभरती योजनेविरोधातील असंतोष तीव्र होत असल्यामुळे शनिवारी केंद्र सरकारने भावी अग्निवीरांना सवलती देऊ करून त्यांचा संताप शमवण्याचा प्रयत्न केला.
  • संरक्षण, गृह, शिक्षण, जहाज आणि बंदर विकास आदी मंत्रालयांनी विविध तरतुदी जाहीर केल्या.
  • संरक्षण मंत्रालय, निमलष्करी दलांत 10 टक्के आरक्षणाबरोबरच अन्य सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने सामावून घेण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
  • ‘अग्निपथ’मध्ये सैन्यदलांत फक्त चार वर्षांची नोकरी आणि निवृत्तिवेतनाचा अभाव या दोन प्रमुख त्रुटींमुळे तरुणांमध्ये या योजनेविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला असून देशभर हिंसाचार उफाळला आहे.
  • तसेच, खासगी क्षेत्रांत नोकरी मिळवण्यासाठी आणि कारकीर्द घडवण्यासाठी शैक्षणिक व आर्थिक मदत करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
  • केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत तटरक्षक दल तसेच, संरक्षण क्षेत्रातील पदांमध्ये आणि 16 सरकारी कंपन्यांमध्ये दहा टक्के नोकऱ्या अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा संरक्षण मंत्रालयाने केली आहे.
  • शिवाय, गृहमंत्रालयानेही पोलीस दलांमध्ये दहा टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचे जाहीर केले आहे.
  • ‘र्मचट नेव्ही’तही नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
  • ‘अग्निपथ’च्या सैन्यभरतीमध्ये पहिल्या वर्षी कमाल वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली आहे.
  • चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरांना विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
  • शिक्षणासाठी तसेच, उद्योजकतेसाठीही आर्थिक साह्य दिले जाणार आहे.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी क्रीडा ज्योतीच्या दौडीला प्रारंभ :

  • आगामी 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित क्रीडा ज्योतीच्या दौडीला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेंडा दाखवला.
  • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) प्रथमच ऑलिम्पिकच्या धर्तीवर क्रीडा ज्योतीच्या दौडीचे आयोजन केले आहे.
  • यंदा भारताला पहिल्यांदा बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवण्याची संधी लाभणार आहे.
  • ही स्पर्धा 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत चेन्नईजवळील महाबलीपुरम येथे खेळण्यात येईल.
  • बुद्धिबळ ऑलिम्पियाडची क्रीडा ज्योत पुढील 40 दिवसांत भारतातील 75 शहरांमध्ये नेण्यात येणार आहे.
  • यंदा भारतात होणाऱ्या ऑलिम्पियाड स्पर्धेत 188 देशांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

कनिष्ठ आशियाई स्क्वॉश स्पर्धात अनाहत सिंगची सुवर्णकमाई :

  • भारताची उदयोन्मुख स्क्वॉशपटू अनाहत सिंगने रविवारी कनिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेतील मुलींच्या 15 वर्षांखालील गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.
  • थायलंडमधील पटाया येथे झालेल्या या स्पर्धेत 14 वर्षीय अनाहतने हाँगकाँगच्या क्वोंग एनावर अंतिम सामन्यात 3-0 अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
  • सामन्याच्या सुरुवातीपासूनच अनाहतने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही व सामना सरळ तीन गेममध्ये जिंकला.
  • अनाहतने आतापर्यंत 46 राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या असून दोन राष्ट्रीय अजिंक्यपदे आणि दोन आंतरराष्ट्रीय जेतेपदेही तिने पटकावली आहेत.
  • अमेरिकन आणि ब्रिटिश या कनिष्ठ गटांतील दोन स्पर्धा जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.

आठ वर्षांच्या कालावधीसाठी सादर केले तीन पॅकेज :

  • गेल्याच आठवड्यात भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे माध्यम हक्क विकले.
  • तीन दिवस चाललेल्या या ई-लिलावाद्वारे बीसीसीआयला विक्रमी 48 हजार 390 कोटी रुपये मिळाले.
  • बीसीसीआय पाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनेदेखील माध्यम हक्क विक्रीसाठी निविदा खुल्या केल्या आहेत.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) 20 जूनपासून माध्यम हक्क निविदा विकरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.
  • या निविदा 2024 पासून पुढील आठ वर्षांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या 711 सामन्यांसाठी असतील.
  • आयसीसी एकूण तीन पॅकेज सादर करणार आहे. या पॅकेजमध्ये महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकाचाही समावेश आहे.
  • याशिवाय, पुरुष आणि महिला सामन्यांसाठी स्वतंत्रपणे बोली आयोजित केली जाणार आहे.

दिनविशेष :

  • 20 जून हा दिवस जागतिक शरणार्थी दिन म्हणून पाळला जातो.
  • इंग्लंडच्या राणीपदी 20 जून 1837 मध्ये व्हिक्टोरिया यजमान झाल्या.
  • देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी.एस.टी.) हे 20 जून 1887 रोजी सुरू झाले.
  • 20 जून 1921 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना 20 जून 190 मध्ये झाली.
  • महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ 20 जून 1997 रोजी सुरू झाली.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.