19 जून 2022 चालू घडामोडी

इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (१९ जून २०२२)

शेताच्या बांधावरून होणारे तंटे संपणार :

  • जमिनींच्या बांधांवरून होणारे वाद कायमचे मिटणार आहेत.
  • कारण आता मोजणीची प्रकरणे ही वेगाने आणि अचूक होण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून रायगड जिल्ह्यासाठी 6 जमीन मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) खरेदी करण्यात येणार आहेत.
  • उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे (सिग्नल) रोव्हर मशीनच्या माध्यमातून मिळणारे अक्षांश आणि रेखांश हे कायमस्वरूपी जतन होणार आहेत.
  • या पद्धतीने होणाऱ्या मोजणीमुळे बांध खोदून जमीन बळकावण्याचे प्रकार कायमचे थांबणार असून, नैसर्गिक आपत्तीमुळे मोजणीच्या खुणा गेल्या, तरी अक्षांश आणि रेखांशांच्या साह्याने पूर्वीच्या खुणा मिळू शकणार आहेत.
  • यापूर्वी प्लेन टेबलने जमीन मोजणी करण्यात येत होती. त्यामुळे जमीन मोजणीसाठी विलंब लागायचा.
  • सध्या इलेक्ट्रॉनिक टोटल मशीन (ईटीएस) यंत्रांच्या साह्याने मोजणी केली जाते.
  • रोव्हर मशीनमुळे जमीन मोजणी ही उपग्रहाच्या साह्याने केली जाणार असल्याने ही मोजणी अचूक असणार आहे.
  • मोजणी करण्यासाठी 77 मोजणी स्थानके म्हणजे कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन (कॉर्स) उभारण्यात येणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा वाढदिवसाच्या दिवशी अनोखा सन्मान :

  • गांधीनगरमधील एका रस्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांचा 18 जूनरोजी वाढदिवस आहे.
  • त्या वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त मोदींनी आईची भेट घेतल्याचा फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत.
  • पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा वाढदिवसाच्या दिवशी अनोखा सन्मान केला जात आहे.
  • त्यांच्या नावाने आता एक रस्ता ओळखला जाणार आहे. रायसन पेट्रोल पंपापासून ८० मीटर रस्त्याला ‘पूज्य हिराबा मार्ग’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असांज यांच्या अमेरिकेतील प्रत्यार्पणास ब्रिटनची मंजुरी :

  • इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धांशी संबंधित गोपनीय दस्तावेज उघड केल्याच्या आरोपावरून ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज यांचे अमेरिकेस प्रत्यार्पण करण्यास ब्रिटन सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली.
  • ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मूळचे ऑस्ट्रेलियाचे 50 वर्षीय नागरिक असांज यांच्या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी केली.
  • अमेरिकेत जाणे टाळण्यासाठी असांज अनेक वर्षांपासून देत असलेल्या कायदेशीर लढाईस मिळालेले हे महत्त्वपूर्ण वळण आहे.
  • मात्र, असांज यांना या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यासाठी 14 दिवसांचा अवधी आहे.
  • असांज यांचे वकील कायदेशीर लढाईची दुसरी फेरी पुन्हा सुरू करण्याचीच शक्यता आहे.

ऑलिम्पिक विजेत्या नीरजला सुवर्णपदक :

  • भालाफेकपटू नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकानंतर शनिवारी पहिले जेतेपद पटकावले.
  • फिनलंड येथे सुरू असलेल्या क्योर्टाने क्रीडा स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.69 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक कमावले.
  • या निमित्ताने विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सला चार दिवसांत त्याने दोनदा मागे टाकले.
  • त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या माजी ऑलिम्पिक विजेत्या केशॉर्न वॉलकॉट आणि ग्रनाडाच्या पीटर्स यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
  • नुकत्याच झालेल्या पाव्हो नूर्मी क्रीडा स्पर्धेत 24 वर्षीय नीरजने 89.30 मीटर अंतरावर भाला फेकून स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडित काढला होता.
  • याआधी नीरजच्या नावावर 88.07 मीटरचा राष्ट्रीय विक्रम होता.

दिनविशेष :

  • 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सरदार नेताजी पालकर यास शुद्ध करून हिंदू धर्म स्वीकारला.
  • १९ जून १९०१ हा भारतातील सुप्रसिध्द गणिततज्ञ व सांख्यिकीविज्ञ ‘रामचंद्र बोस’ यांचा जन्मदिन आहे.
  • हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 मध्ये महाराष्ट्रातील मर्द मराठ्यांची शिवसेना स्थापन केली.

इतरांना शेअर करा .......

Leave a Comment