चालू घडामोडी (जून २८, २०२२)
देशात अंतराळ प्रक्षेपण क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले :
- राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राने (इन-स्पेस) अंतरिक्ष क्षेत्रात प्रक्षेपणासाठी खासगी उद्योगांना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राला हे दालन खुले झाले आहे.
- भारतातील खासगी उद्योगांना अंतराळ क्षेत्रात प्रोत्साहन, त्यांना अधिकृत मान्यता आणि त्यांच्यावर नियंत्रण व देखरेखीसाठी ‘अंतराळात’ ही स्वायत्त संस्था स्थापण्यात आहे.
- तसेच हैदराबादच्या ‘ध्रुव स्पेस प्रायव्हेट लिमिटेड’ आणि बंगळुरूच्या ‘दिगंतर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्यांना अंतराळ प्रक्षेपणास मंजुरी दिली.
- ‘ध्रुव स्पेस’च्या ‘ध्रुव स्पेस सॅटेलाइट ऑर्बिटल डिप्लॉयर’ व ‘दिगंतर रिसर्च’च्या ‘रोबस्ट इंटिग्रेटिंग प्रोटॉन फ्लुएन्स मीटर’ (रोबी) या दोन उपकरणांना (‘पेलोड’) प्रक्षेपणास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
- तर त्यांना ‘PSLV-C53’ च्या ‘पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल’द्वारे (पीओईएम) 30 जूनला प्रक्षेपित केले जाणार आहे.
- ‘ध्रुव अवकाश’ आणि ‘दिगंतर संशोधन’ हे अंतराळ तंत्रज्ञान नवउद्योग (स्टार्टअप) आहे.
- ‘पीएसएलव्ही-सी53’ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) 55 वी मोहीम आहे.
- 30 जूनला हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी सहाला प्रक्षेपित केले जाणार आहे.
भारतात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीचे मोदींचे आवाहन :
- भारताची हवामानाबाबतची बांधिलकी त्याच्या कामगिरीवरून अधोरेखित होते.
- भारतासारखा मोठा देश जेव्हा अशी महत्त्वाकांक्षा दाखवतो, तेव्हा इतर विकसनशील देशांनाही प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
- स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाची मोठी बाजारपेठ भारतात उदयास येत आहे G-7 देशांनी या क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही मोदी यांनी केले.
- जर्मनीत आयोजित केलेल्या ‘जी-7 परिषदे’च्या निमित्ताने मोदी यांनी हवामान आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांत भारत करीत असलेल्या कामगिरीची माहिती दिली.
- यावेळी मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कॉल्झ, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रॅम्फोसा यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली.
- पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारा जगातील पहिला विमानतळ भारतात आहेअसेही मोदी यांनी म्हणाले.
विरोधकांच्या आघाडीतर्फे यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल :
- 18 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
- यशवंत सिन्हा यांनी सोमवारी राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी आदी नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
- राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- तर या दोन नेत्यांत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होईल.
- 18 जुलैला मतदान झाल्यानंतर मतमोजणी 21 जुलैला होणार आहे.
- तर 24 जुलैला विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आहे.
भारतीय महिला संघाचा पराभव :
- कर्णधार चमारी अटापट्टूच्या आक्रमक अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंकेने सोमवारी तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात भारतावर सात गडी राखून विजय मिळवला.
- मात्र या निकालानंतरही भारताने पहिले दोन्ही सामने जिंकल्याने या मालिकेत 2-1 अशी बाजी मारली.
- भारताने दिलेले 139 धावांचे आव्हान यजमान श्रीलंकेने 17 षटकांतच पूर्ण केले.
- त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 20 षटकांत 5 बाद 138 उभारली.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धात मध्य प्रदेश नवविजेते :
- पंडित यांच्या मार्गदर्शनाखालील मध्य प्रदेश संघाने 41 वेळा विजेत्या मुंबईवर सहा गडी राखून मात करत पहिल्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.
- 23 वर्षांपूर्वी बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशला कर्नाटकाकडून पराभव पत्करावा लागला होता.
- तर त्या वेळी पंडित हे मध्य प्रदेशचे कर्णधारपद भूषवत होते. त्यानंतरच्या दोन दशकांत पंडित यांनी प्रशिक्षक म्हणून पाच वेळा रणजी करंडक जिंकला.
- भारतीय स्थानिक क्रिकेटमधील द्रोणाचार्य अशी ख्याती असलेल्या पंडित यांच्या मार्गदर्शनात विदर्भाने अनपेक्षितरीत्या दोन वेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले होते.
- 20 रणजी करंडकावर आपले नाव कोरणारा मध्य प्रदेश हा 20 वी युनियन ठरला. त्यांनी एकदा उपविजेतेपद मिळवले आहे.
दिनविशेष :
- भारताचे 9वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 मध्ये झाला.
- 28 जून 1937 मध्ये साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक ‘डॉ. गंगाधर पानतावणे’ यांचा जन्म झाला.
- अमेरिकेतील सर्वोच्व न्यायालयाने 1978 मध्ये महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
- संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला 28 जून 1998 मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली होती.