दीपक हुडा
चालू घडामोडी (२९ जून २०२२)
सरकारी योजनांची जबाबदारी लवकरच सहकारी बँकांवर :
- सहकारी बँकांकडे सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी लवकरच दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली.
- गुजरात राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (कृषी बँक) 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते.
- आतापर्यंत सरकारच्या आधार कार्ड-एटीएम-मोबाईलद्वारे थेट लाभ हस्तांतरण योजना (जेएएम-डीबीटी) राबवण्यात सहकार क्षेत्राचा संबंध नव्हता.
- परंतु आता सहकारी बँकांच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- शहा म्हणाले, की ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी) योजनेतून निधी सरकारकडून जन धन खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाच्या (जेएएम) समन्वयातून लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातात.
- सरकारी अनुदानाशी संबंधित अनियमितता दूर करण्यासाठी सरकार जन धन खाते, आधार आणि मोबाइल क्रमांक एकमेकांशी जोडू इच्छित आहे.
- सध्या 52 मंत्रालये ‘जेएएम’द्वारे लाभार्थीना मदत करण्यासाठी ‘dbt’ अमलात आणत आहेत.
- अशा प्रकारे सुमारे 300 सरकारी योजनांच्या लाभार्थीच्या खात्यावर थेट रक्कम पाठवली जाते.
मुकेश अंबानींचा रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा :
- रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
- मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
- मंगळवारी रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
- यानुसार आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- यानुसार, पंकज मोहन पवार यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. ही नियुक्ती 5 वर्षांसाठी आहे.
- रमिंदर सिंग गुजराल व के. व्ही. चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
तेलंगणात शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक मदत योजना :
- तेलंगणा सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांसाठी रयतू बंधू गुंतवणूक मदत योजना सुरू केली, असे राज्य सरकारच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
- राज्याचे कृषिमंत्री निरंजन रेड्डी यांनी सांगितले की, पहिल्याच दिवशी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत 586 कोटी 65 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
- शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक मदत योजना राबविणारे तेलंगण हे देशातील पहिले राज्य ठरले असून भाजप किंवा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनीही कधी अशी योजना राबविलेली नाही, असे रेड्डी म्हणाले.
- शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकांच्या खरेदीसाठी राज्य सरकारने हंगामासाठी एकरी ५ हजार रुपये दिले.
भारतीय संघाने हार्दिकच्या नेतृत्वाखाली जिंकली मालिका :
- भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर (मालाहाइड) खेळवण्यात आला.
- शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना भारताने चार धावांनी जिंकला.
- या विजयासह भारताने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे.
- शताब्दी दीपक हुडा आणि अर्धशतकी खेळी केलेला संजू सॅमसन हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
- दीपक हुडाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत रोहित शर्माच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला.
- आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू ठरला.
- त्याच्यापूर्वी केएल राहुल, रोहित शर्मा, सुरेश रैना यांनी शतके झळकावली आहेत.
ईऑन मॉर्गन निवृत्त :
- ईऑन मॉर्गनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतानाच इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपदही सात वर्षांहून अधिक काळानंतर सोडले.
- 2015 च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आक्रमक दृष्टिकोनासाठी मॉर्गनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती.
- मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 मध्ये प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम दाखवला.
- त्याच्या नेतृत्व कारकीर्दीतच इंग्लंड संघाने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 प्रकारात अग्रस्थान पटकावले.
हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे निधन :
- ज्येष्ठ भारतीय हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे जलंधरमध्ये निधन झाले.
- भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवून देण्यामध्ये पंजाब आणि हरियाणामधील अनेक खेळाडूंनी आपले योगदान दिले होते.
- त्यामध्ये ऑलिंपिक पदक विजेता आणि विश्वचषक विजेता वरिंदर सिंग यांचाही समावेश होता.
- वरिंदर सिंग हे 1975मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.
- तर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे हे पहिले आणि एकमेव सुवर्णपदक आहे.
- 2007 मध्ये भारतीय हॉकीतील योगदानासाठी वरिंदर सिंग यांना प्रतिष्ठित ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दिनविशेष :
- १८७० मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.
- मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म 29 जून 1871 मध्ये झाला.
- ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना 2001 या वर्षी एम.पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
- पं.हृदयनाथ मंगेशकर यांना 2001 या वर्षी नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
- वर्ष 2007 मध्ये ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.