चालू घडामोडी (2 जुलै 2022)
भारतात 1 जुलैपासून एकल वापर प्लास्टिकवर बंदी :
- केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशात एकल वापर प्लास्टिक (single use plastic) वर बंदी घातली आहे.
- एकल वापर प्लास्टिक म्हणजेच प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू, ज्या आपण एकदाच वापरतोत्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे.
- बंदी घातलेल्या उत्पादनाची निर्मिती किंवा विक्री केल्यास पर्यावरण कायदा कलम 15 अंतर्गत 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
- प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन ,प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स, फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक, प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक, आयसक्रीम स्टिक, थर्माकोल (पॉलिस्ट्रिन), प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद, इन्विटेशन कार्ड, सिगरेटचं पॅकेट, 100 मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनरस्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी) या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 18 जुलैपासून सुरुवात :
- संसदेच्या पावसाळी अधिवेशनची तारीख जाहीर झाली आहे.
- 18 जुलैला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून 13 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे.
- लोकसभा सचिवालायाने प्रसिद्धीपत्रक जारी करत अधिवेशनाची तारीख जाहीर केली आहे.
- तर या अधिवेशनात विरोधी पक्ष कोणकोणत्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ सारखे अनेक प्रश्न अधिवेशनात मांडले जाऊ शकतात.
- तसेच देशभरातून विरोध केल्या जाणाऱ्या अग्निपथ योजनेवरूनही विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
डायमंड लीग अॅथलेटिक्सत नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी :
- ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अॅथलेटिक्समध्ये गुरुवारी ८९.९४ मी अंतरासह स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत दुसरे स्थान मिळवले.
- मात्र, तारांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत त्याला 90 मीटरचा टप्पा गाठण्यात थोडक्यात अपयश आले.
- 24 वर्षीय नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.94 मीटर अंतर पार करत आपला 89.30 मीटर अंतराचा राष्ट्रीय विक्रम मोडला.
- तर हा विक्रम त्याने पावो नुर्मी क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रस्थापित केला होईल.
- अखेर तीच नीरजची सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि त्याला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
- जागतिक विजेत्या आणि हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 90.31 मी अंतर भाला फेकत अग्रस्थान मिळवले.
मलेशिया बॅडमिंटन स्पर्धात सिंधू, प्रणॉयचा पराभव :
- दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूचे मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले.
- चायनीज तैपेईचा ताई झू यिंगकडून तीन गेममधील संघर्षांनंतर सिंधूने पराभव पत्करला.
- याचप्रमाणे थॉमस चषकातील भारताच्या जेतेपदाचा शिलेदार एच.एस.प्रणॉयची वाटचालसुद्धा संपुष्टात आली.
दिनविशेष :
- 2 जुलै हा दिवस जागतिक युएफओ (UFO) दिन म्हणून पाळला जातो.
- १८६५ मध्ये साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे 2 जुलै 1940 मध्ये स्थानबद्ध करण्यात आले.
- पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी 1972 मध्ये सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
- 2001 मध्ये बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे 104 फूट उंचीचा बौध्द स्तूप सापडला.