1 जुलै 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

 

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

चालू घडामोडी (1 जुलै 2022)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ :

 • शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
 • शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
 • चांगले बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दीघे यांच्या शिकवणीचा विजय आहे, असे शिंदे म्हणाले आहेत. तसेच सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाईल, अशी ग्वाहीदेखील शिंदे यांनी दिली.

अग्निपथ योजनेविरोधातील ठराव पंजाब विधानसभेत संमत :

 • केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात पंजाब विधानसभेत गुरुवारी ठराव मंजूर करण्यात आला.
 • मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा ठराव मांडला होता.
 • तर या ठरावावर चर्चा करताना मान म्हणाले, अग्निपथाच्या विरोधाचा मुद्दा पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे.

मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धात सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत :

 • दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय या भारतीय खेळाडूंनी गुरुवारी मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला व पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
 • जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूने थायलंडच्या फिट्टायापोर्न चायवॉनला 19-21, 21-9, 21-14 असे 57 मिनिटे चाललेल्या लढतीत नमवले.
 • या सामन्याचा पहिला गेम सिंधूने दोन गुणांनी गमावला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन करत सामना बरोबरीत आणला.
 • पुढच्या फेरीत सिंधूचा चायनीज तैपेईच्या तय झु यिंगशी सामना होणार आहे.
 • पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये जागतिक क्रमवारीत 21व्या स्थानी असलेल्या प्रणॉयने चौथ्या मानांकित चायनीज तैपेईच्या चोउ टिएन चेनला 21-15, 21-7 असा पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.

जम्मू-काश्मीरमध्ये ‘जी 20’ची बैठक घेण्यास चीनचा विरोध :

 • ‘जी 20’ देशांशी पुढील वर्षीची बैठक जम्मू काश्मीरमध्ये घेण्याचा भारताचा मनोदय आहे, मात्र याला चीनने जोरदार विरोध केला आहे.
 • निकटचा सहयोगी पाकिस्तानच्या स्वरात स्वर मिळवत चीनने अधोरेखित केले की संबंधित बाजूंनी या समस्येचे ‘राजकारण’ टाळले पाहिजे.
 • चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, काश्मीरबाबत चीनचे धोरण स्पष्ट आहे.
 • तर हा मुद्दा भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्वीपासूनच आहे. संयुक्त राष्ट्रच्या संबंधित प्रस्ताव और द्विपक्षीय सहमतीनुसार योग्य तोडगा याबाबत निघणे आवश्यक आहे.
 • ‘G20’चे सदस्य म्हणून चीन बैठकीत सहभागी होईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना लिजियान यांनी सांगितले की, बैठकीत सहभाग घ्यावा किंवा नाही, याबाबत विचार करण्यात येणार आहे.
 • ‘जी 20’ची जम्मू काश्मीरमध्ये बैठक घेण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानने 25 जून रोजी विरोध केला होईल.

दिनविशेष :

 • 1 जुलैमहाराष्ट्र कृषी दिन
 • 1 जुलैभारतीय डॉक्टर दिन
 • मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना 1 जुलै 1934 मध्ये यश आले.
 • 1 जुलै 1947 मध्ये फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
 • सोमालिया आणि घाना अरे देश 1 जुलै 1960 मध्ये स्वतंत्र झाले.
 • रवांडा आणि बुरुंडी अरे देश 1 जुलै 1962 मध्ये स्वतंत्र झाले.
 • 1 जुलै 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment