14 जुलै 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (14 जुलै 2022)

75 दिवस वर्धक मात्रा मोफत :

 • सर्व प्रौढांना शुक्रवारपासून 75 दिवस करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला.
 • तर यामुळे करोना लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी मिळण्याचे संकेत आहेत.
 • खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरणाचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला होता.
 • आत्तापर्यंत 96 टक्के पात्र लोकांना पहिली, तर 87 टक्के पात्र नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
 • मात्र, आतापर्यंत 18 ते 59 वर्षे वयोगटातील 77 कोटी लोकसंख्येपैकी 1 टक्क्यांहूनही कमी नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्याचे आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ऋषी सुनक होणार ब्रिटनचे पंतप्रधान :

 • ब्रिटनचे काळजीवाहू पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 • त्यानंतर आता कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 • भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधान पदाच्या एक पाऊल जवळ पोहोचले आहेत.
 • सुनक यांनी पहिल्या फेरीत सर्वाधिक मतं मिळवली आहेत.
 • यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील दोन उमेदवार बाद ठरले असून ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 • मूळचे भारतीय असलेले ऋषी सुनक हे इन्फोसेसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
 • सुनक हे बोरिस जॉन्सन सरकारच्या काळात अर्थमंत्री होते.

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा :

 • नवनीत कौरने नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी विश्वचषक हॉकी स्पर्धेत जपानवर 3-1 असा विजय मिळवला आणि स्पर्धेची सांगता नवव्या क्रमांकानिशी केली.
 • नवनीतने दोन मैदानी गोल केले, तर दीप ग्रेस एक्काने पेनल्टी कॉर्नरच्या साहाय्याने गोल करत संघाच्या विजयात योगदान दिले.
 • जपानकडून एकमात्र गोल यू असाइने केला.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात शाहू-मेहुलीला सुवर्ण :

 • मेहुली घोष आणि शाहू माने यांनी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात बुधवारी भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले, तर 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक गटामध्ये पलक व शिवा नरवाल जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • शाहू व मेहुली जोडीने निर्णायक फेरीत हंगेरीच्या ईस्झटर मेसझारोस आणि इस्तवान पेन जोडीला 17-13 असे चुरशीच्या लढतीत नमवले.
 • तर या गटात इस्राइलने तिसरे आणि चेक प्रजासत्ताकने चौथे स्थान मिळवले.
 • शाहूचे भारताकडून वरिष्ठ गटासाठीचे हे पहिले सुवर्णपदक आहे, तर मेहुलीने दुसऱ्यांदा देशासाठी सुवर्णकामगिरी केली आहे.
 • यापूर्वी तिने 2019 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
 • एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक गटामधील कांस्यपदकाच्या एकतर्फी सामन्यात भारताच्या पलक आणि शिवा जोडीने कझाकस्तानच्या इरिना लोकतिओनोव्हा आणि व्हालेरिया रखिमझान जोडीला 16-0 असे पराभूत करत बाजी मारली.
 • तर या कामगिरीमुळे भारतीय संघाने पदकतालिकेत सर्बियानंतर दुसरे स्थान गाठले.
 • भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक मिळवले आहे.

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमावारीत जसप्रीत बुमराहची अव्वल स्थानी झेप :

 • इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर अर्धा संघ गारद केला.
 • तर त्याच्या या कामगिरीमुळे त्याने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमावारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
 • इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बुमराहने 19 धावा देऊन 6 बळी घेतले.
 • तसेच याच क्रमावारीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर तर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
 • चौथ्या क्रमांकावर जोश हेझलवूड तर अफगाणिस्तानचा मुझीर उर रहमान पाचव्या स्थानावर आहेत.

दिनविशेष :

 • थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी झाला.
 • महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म 14 जुलै 1884 मध्ये झाला.
 • सन 2003 या वर्षी जागतिक बुद्धिबळ महासंघ व्दारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
 • डाकतार विभागाची 163 वर्षांपासूनची तार सेवा 14 जुलै 2013 मध्ये बंद झाली.

इतरांना शेअर करा .......

Leave a Comment