15 July 2022 Current Affairs In Marathi | 15 जुलै 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

गोताबया राजपक्षे

चालू घडामोडी (15 जुलै 2022)

श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांचा राजीनामा :

  • श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला.
  • राजपक्षे यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे श्रीलंका प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षांना पाठवला आहे.
  • राजपक्षे यांनी बुधवारी देश सोडला आणि ते मालदीवला गेले.
  • तर त्यांनी देश सोडल्यानंतर काही तासांत पंतप्रधान रानील विक्रमसिंघे हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण :

  • गुरुवारी केरळमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णाची नोंद झाली आहे.
  • मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण आहे.
  • संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे.
  • तसेच त्याच्या संपर्कात 11 जण आल्याचेदेखील पुढे आले आहे.
  • तर या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाची नोंद करण्यात आली.
  • मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असतात.
  • तर हा रोग 1958 मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये आढळला होता. त्यामुळे त्याचे मंकीपॉक्स, असे नाव पडले.
  • हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात भारत अव्वल :

  • नेमबाजांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने ‘ISSF’ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थान मिळवले.
  • भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्यपदकासह एकूण आठ पदकांची कमाई केली.
  • यामध्ये महाराष्ट्राच्या शाहूने सांघिक गटांमध्ये दोन सुवर्णपदके पटकावत आपली छाप पाडली.
  • भारताच्या अर्जुन बबुता, शाहू माने आणि पार्थ मखिजा या त्रिकुटाने 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात कोरियाला 17-15 असे पराभूत करत देशासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले.
  • अर्जुन आणि शाहूचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले.
  • पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात भारताने इटलीकडून १५-१७ असा पराभव पत्करल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • दिवसाचे तिसरे रौप्यपदक भारताने 10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक गटात मिळवले.

दिनविशेष :

  • 15 जुलै 1955 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.
  • ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा 15 जुलै 1962 मध्ये पुणे येथे प्रारंभ.
  • 15 जुलै 2006 मध्ये ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.