31 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

वंदे भारत ट्रेन

चालू घडामोडी (31 सप्टेंबर 2022)

आज देशाला मिळणार तिसरी ‘वंदे भारत ट्रेन’:

  • भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आता गुजरातच्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.
  • पंतप्रधान मोदी आज या नवीन सुधारित ट्रेनला हिरावा झेंडा दाखवणार आहेत.
  • काही दिवसांपूर्वीच या मार्गावर या ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.
  • यामुळे आता देशाला तिसरी वंदे भारत ट्रेन आज प्राप्त होणार आहे.
  • वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एकूण 1 हजार 128 प्रवासी बसण्याची क्षमता आहे.
  • पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली.
  • त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली.

संस्कृतच्या प्रमाणित भाषांतरासाठी एक लाख वाक्यसमूह :

  • गूगलच्या विविध भाषा अनुवादित करण्याच्या सुविधेमध्ये (गूगल ट्रान्सलेट)आता संस्कृतचे प्रमाणित भाषांतर होऊ शकेल.
  • ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदे’च्या (आयसीसीआर) पुढाकाराने प्रायोगिक तत्त्वावर संस्कृत भाषांतराचा प्रयोग सुरू असून आतापर्यंत ‘गूगल ट्रान्सलेट’साठी संस्कृतची एक लाख वाक्यसमूह तयार केली आहेत.
  • त्यामध्ये दैनंदिन वापरातील शब्द व वाक्यांचा वापर करण्यात आला आहे.
  • त्यामुळे संस्कृतचा अन्य भाषांमध्ये व अन्य भाषांचा संस्कृतमध्ये उत्तम अनुवाद केला जाऊ शकतो.
  • संस्कृत भाषांतरासाठी ‘गूगल ट्रान्सलेट’ सुविधेचा सर्वाधिक वापर केला असला तरी, प्रमाणित व रोजच्या वापरातील शब्दांचा वापर अधिक महत्त्वाचा आहे.
  • संस्कृत भाषा जागतिक स्तरावर नेण्यासाठी अनुवादाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गाडीमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य :

  • केंद्र सरकारने प्रवासी कारसाठी सहा-एअरबॅग अनिवार्य नियमाची अंमलबजावणी पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलले आहे.
  • केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज याबाबत घोषणा केली.
  • जागतिक पुरवठा साखळीतील समस्यांमुळे सहा एरअर बॅग निर्देश पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असून, त्यामुळे हा नियम आता 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे.
  • यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने आठ आसनी वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज बसवणे बंधनकारक केले होते.
  • हा आदेश 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार होता.

एचएस प्रणोय जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा पहिल्या 15 मध्ये :

  • भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने आज दोन स्थानांची सुधारणा करत ताज्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 15 वे स्थान मिळविले आहे.
  • जागतिक अजिंक्यपद आणि जपान ओपन सुपर 750 या स्पर्धांत प्रणोयने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती, त्याचा फायदा झाला आहे.
  • भारताचा नवा आशास्थान असलेला लक्ष्य सेन भारतीयांमधील सर्वात चांगले स्थान असलेला खेळाडू ठरला आहे.
  • पुरुषांच्या क्रमवारीत तो नवव्या; तर किदांबी श्रीकांत 11 व्या स्थानावर आहे.

कर्णधार रोहित शर्माने रचला नवा विक्रम :

  • भेदक गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारतानं पहिल्या टी20सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव केला.
  • या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 नं आघाडी मी पण घेतला.
  • टी20 मालिकेतील या विजयामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने माजी कर्णधार एमएस धोनी याचा मोठा विक्रम मोडला आहे.
  • तो भारताचा टी20 प्रकारातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरत आहे.
  • एकाच वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकणारा भारतीय कर्णधार हा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे.
  • हा विक्रम करताना त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला मागे टाकले आहे.

दिनविशेष :

  • 30 सप्टेंबरआंतरराष्ट्रीय भाषांतर दिन
  • ब्रिटनची पहिली ट्राम सेवा 30 सप्टेंबर 1860 मध्ये सुरु झाली.
  • थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर 30 सप्टेंबर 1882 मध्ये सुरु झाले.
  • 30 सप्टेंबर 1895 मध्ये फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.
  • हुव्हर धरणाचे बांधकाम 30 सप्टेंबर 1935 मध्ये पूर्ण झाले.
  • पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात 30 सप्टेंबर 1947 मध्ये प्रवेश.
  • 30 सप्टेंबर 1966 मध्ये युनायटेड किंगडम पासून बोत्सवाना स्वातंत्र्य.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.