13 जानेवारी 2023 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (13 जानेवारी 2023)

भारतीय डॉक्टरने विकसित केले तोंडाच्या कर्करोगावरील औषध:

 • कर्करोगावरील उपचार कमीत कमी वेदनादायी आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध व्हावा यासाठी भारतीय डॉक्टरने हाती घेतलेल्या एका संशोधनाची दखल जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकांकडून घेण्यात आली आहे.
 • डॉ. विजय कनुरू यांनी नॅनो कर्क्युमीनच्या वापरातून तोंडाच्या कर्करोगावर औषध विकसित केले असून, वैद्यकीय संशोधनातून त्याबाबत हाती लागलेले निष्कर्षही समाधानकारक आहेत.
 • या औषधाची परिणामकारकता वैद्यकीय संशोधनातून (क्लिनिकल ट्रायल) स्पष्ट झाली असून‘जर्नल ऑफ ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल पॅथोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने त्याची दखल घेतली आहे.
 • या संशोधनामुळे प्राथमिक अवस्थेतील तोंडाच्या कर्करोगावर तीव्र औषधांच्या वापराशिवाय उपचार करणे शक्य होणार आहे.
 • त्यामुळे, भविष्यात केमोथेरपी आणि रेडिएशनसारख्या उपचारांवरील अवलंबित्वही कमी होणार आहे.

विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या महासंग्रामाला आजपासून प्रारंभ:

 • गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यकमाई करणारा भारतीय पुरुष संघ आता विश्वचषक हॉकी स्पर्धेतील 48 वर्षांपासूनचा पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे.
 • भारताला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला असून या स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे.
 • स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतापुढे सलामीला तुल्यबळ स्पेनचे आव्हान असेल.
 • ऑलिम्पिकमध्ये तब्बल आठ सुवर्णपदके पटकावणारा भारतीय संघ गेल्या जवळपास पाच दशकांपासून विश्वचषकात मात्र पदकापासून वंचित आहे.
 • 1978 ते 2018 या कालावधीत भारताला विश्वचषकात साखळी फेरीचा टप्पाही ओलांडता आला नाही.

ईडन गार्डनवर दिसली कुलदीपने मोडले अनेक विक्रम:

 • पहिल्या एकदिवसीय सामन्यात युजवेन्द्र चहलला दुखापत झाल्याने श्रीलंकेविरुद्ध कर्णधार रोहित शर्माने त्याच्या ऐवजी कुलदीप यादवला अंतिम अकरा मध्ये स्थान दिले.
 • कुलदीपने मागील सामन्यात नाबाद शतकी खेळी करणारा श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याला खेळपट्टीवर अधिक काळ टिकण्याआधीच त्याला माघारी पाठवले.
 • ही कामगिरी करताना त्याने अनेक विक्रम मोडीत काढले.
 • श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीपने एकापाठोपाठ तीन विकेट घेत बळींचे द्विशतक पूर्ण केले.
 • कुलदीपने आजच्या या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 200 बळी पूर्ण केले.
 • हा पराक्रम करण्यासाठी कुलदीपला 107 सामने आणि 110 डाव खेळावे लागले आणि या टप्प्यापर्यंत पोहोचणारा तो भारताचा 23वा गोलंदाज ठरला.
 • कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 72 सामने खेळत सर्वाधिक 122 विकेट्स घेतल्या आहेत.

दिनविशेष:

 • 13 जानेवारी 1610 मध्ये गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.
 • मिकी माउस व्यंगचित्रे 13 जानेवारी 1930 मध्ये प्रथम प्रकाशित.
 • 13 जानेवारी 1953 मध्ये मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.
 • हिराकुंड धरणाचे उद्घाटन 13 जानेवारी 1957 मध्ये झाले.

 


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.