15 मे 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (१५ मे २०२२)

संयुक्त अरब अमिरात अध्यक्षपदी शेख मोहम्मद बिन झायेद :

  • संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षपदी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • शुक्रवारी अमिरातीचे अध्यक्ष खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधन झाले.
  • त्यानंतर सात अमिरातींच्या अबुधाबीतील अल मुश्रीफ महालात झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
  • शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या घराण्याकडे संयुक्त अरब अमिरातीची वंशपरंपरेने सत्ता आहे.
  • १९७१ मध्ये या सात अमिराती एकत्र येऊन स्वतंत्र देशनिर्मितीनंतर अवघ्या तिसऱ्यांदा सत्तेचा खांदेपालट झाली.

पंजाबमध्ये कारागृहातील व्हीआयपी कल्चर संपुष्टात :

  • पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कारागृहातील व्हीआयपी संस्कृतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
  • तर त्यांनी कारागृहातील सर्व व्हीआयपी खोल्या कारागृह व्यवस्थापन ब्लॉकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तसेच कारागृहात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
  • यापूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबी गायकांना कडक इशारा दिला होता.
  • कोणत्याही गाण्यात बंबदक संस्कृती आणि ठग संस्कृती स्वीकारली जात नाही, असे ते म्हणाले होते.

मुंबईत नौदलाच्या दोन युद्धनौका ‘सूरत’ आणि ‘उदयगिरी’चे जलावतरण :

  • भारतीय नौदलात ठारविक कालावधीनंतर विविध प्रकारच्या युद्धनौका या निवृत्त होत असतांना, त्यांची जागा नवीन युद्धनौका ( warships) घेत असते.
  • काळानुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार, बदलत्या युद्धरणनितीनुसार अनेक बदल करत नव्या युद्धनौकांची उभारणी केली जाते.
  • तर याचाच एक भाग म्हणून देशातील विविध गोदींमध्ये विविध क्षमतेच्या युद्धनौकांची बांधणी युद्धपातळीवर सुरु आहे.
  • मुंबईतील माझागाव गोदीमध्ये ( Mazgaon Docks Limited) सध्या दोन महत्त्वाच्या युद्धनौकांची बांधणी सुरु आहे.
  • तर यापैकी विनाशिका ( Destroyer) आणि फ्रिगेट प्रकारातील प्रत्येकी एक अशा एकुण दोन युद्धनौकांचे जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत १७ इंच ला होणार आहे.
  • विनाशिकेचं नाव सूरत ( INS Surat -D69) आहे तर उदगिरी ( Udaygiri ) असं फ्रिगेटचे नाव आहे.
  • अर्थात या युद्धनौका प्रत्यक्ष नौदलाच्या सेवेत दाखल होतील तेव्हा त्यांना ही संबंधित नावे देण्यात येतील.
  • सध्या सुरतला यार्ड क्रमांक – १२७०७ या नावाने ओळखले जाते. तर उदगिरीला यार्ड क्रमांक – १२६५३ या नावाने ओळखले जाते आहे.

विराट कोहलीने रचला नवा विक्रम :

  • विराट कोहलीने पंजाबविरोधात खेळताना एक मोठा विक्रम केला आहे.
  • आयपीएलमध्ये 6500 धावांपर्यंत मजल मारणारा तो पहिला खेळाडू ठरलाय.
  • विशेष म्हणजे आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
  • हरप्रीत ब्रारने टाकलेल्या चेंडूवर फटका मारताच त्याने 6500 धावांचा टप्पा ओलांडला.
  • विराटनंतर 6000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये सध्या पंजाब किंग्जकडून खेळणारा शिखर धवन हा एकमेव खेळाडू आहे.
  • त्यानंतर या रांगेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा डेविड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दिनविशेष :

  • 15 इंच : भारतीय वृक्ष दिवस
  • 15 इंच : जागतिक कुटुंब दिन.
  • जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी 1718 मध्ये 15 मध्ये घेतले.
  • रॉबर्ट वॉलपोल 1730 मध्ये 15 मध्ये युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
  • 1811 मध्ये 15 मध्ये पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी 1836 मध्ये 15 मध्ये सर्वप्रथम निरीक्षण केले.
  • मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात 1935 मध्ये 15 मध्ये झाली.
  • १५ मे १९४० मध्ये दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.