16 मे 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (१६ मे २०२२)

होल्सिमचा भारतातील व्यवसाय ‘अदानी’कडे :

  • बंदरांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रांत प्रस्थापित असलेल्या अदानी समूहाचा आता सिमेंट उद्योगाचा मार्ग सुकर होणार आह़े
  • ‘होल्सिम लिमिटेड’ कंपनीचा भारतातील व्यवसाय मिळविण्यासाठी 10.5 अब्ज अमेरिकी डॉलरचा करार पूर्ण केल्याचे अदानी समूहाने रविवारी जाहीर केल़े
  • अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत बंदरे, वीज केंद्रे आणि खाणकाम यांच्या संचालनाच्या मुख्य उद्योगांपलीकडे जाऊन विमानतळे, डेटा सेंटर्सपर्यंतच्या विविध क्षेत्रांत मजल मारली आहे.
  • तर या समूहाने गेल्या वर्षी अदानी सिमेंटेशन लिमिटेड आणि अदानी सिमेंट लिमिटेड अशा दोन सिमेंट उपकंपन्या स्थापन केल्या होत्या.
  • होल्सिम लिमिटेडचा अंबुजा सिमेंटमध्ये 63.1 आणि एसीसीमध्ये 54.53 टक्के हिस्सा आह़े आता हा हिस्सा अदानी समूहाला मिळणार आह़े

देवसहायम पिल्लई यांना संतपद बहाल :

  • देवसहायम् पिल्लई यांना ख्रिश्चन धर्मातील संतपद बहाल करण्यात आले.
  • रविवारी व्हॅटिकन सिटी येथे झालेल्या दिमाखदार धार्मिक सोहळय़ात सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी पिल्लई यांना हे पद बहाल केले.
  • पिल्लई यांनी 18 व्या शतकात ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता.
  • संतपद मिळणारे ते पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत.
  • तर गेल्या दोन वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदा ‘व्हॅटिकन’मध्ये संतपद प्रदान सोहळा झाला.
  • देवसहायम यांच्यासह चार महिलांसह नऊ जणांना या सोहळय़ात संतपद बहाल करण्यात आले.

माणिक साहा यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ :

  • बिप्लव कुमार देव यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्रिपुरा भाजपाचे प्रमुख माणिक साहा यांनी रविवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
  • माणिक साहा यांनी आगरतळा येथील राजभवनात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली.
  • राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेले माणिक हे भाजपाचे राज्यसभा खासदार आहेत.
  • याशिवाय ते त्रिपुरा भाजपाचे प्रमुख देखील आहेत.
  • त्रिपुरा विधानसभा निवडणुका 2023 मध्ये होणार असून माणिक साहा हेच या निवडणुकीत पक्षाचा चेहरा असतील, असे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे.

माजी क्रिकेटपटू सायमंड्सचे निधन

  • ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्रय़ू सायमंड्सचे रविवारी वाहन अपघातात निधन झाले.
  • तर गेल्या काही महिन्यांमध्ये निधन पावलेला सायमंड्स हा तिसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला.
  • मार्चमध्ये दिग्गज लेग-स्पिनर शेन वॉर्न आणि यष्टीरक्षक-फलंदाज रॉडनी मार्श यांचे निधन झाले होते. ली.
  • सायमंड्सची ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होते.
  • आक्रमक शैलीतील फलंदाज, ऑफ-स्पिन आणि मध्यमगती गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी सायमंड्सची ओळख होती.
  • 1998 ते 2009 या कालावधीत त्याने 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 14 ट्वेन्टी-20 सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले.

थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धात भारताचा ऐतिहासिक सुवर्णाध्याय :

  • भारतीय बॅडिमटन आणि एकंदर क्रीडा क्षेत्र प्रगतिपथावर असल्याचा रविवारी पुन्हा एकदा प्रत्यय आला.
  • भारतीय पुरुष बॅडिमटन संघाने 14 वेळा विजेत्या इंडोनेशियाचा 3-0 असा धुव्वा उडवण्याची अनपेक्षित कामगिरी करत थॉमस चषक स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली.
  • तर या स्पर्धेच्या 73 वर्षांच्या इतिहासातील भारताचे पहिलेच जेतेपद ठरले.

महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व ‘My11Circle’कडे :

  • एकीकडे आयपीएलची धूम सुरु असताना दुसरीकडे महिला T20 चॅलेंज सामन्यांची जय्यत तयारी सुरु आहे.
  • तर या स्पर्धेसाठी माझे 11 मंडळ या इंडियन फॅन्टॅसी क्रीटा मंचाने मुख्य प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले आहेत.
  • महिला टी-20 चॅलेंज 2022 सामने येत्या 23 मे ते 28 मे या कालावधित पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
  • तर या सामन्यांचे मुख्य प्रोयजकत्व मिळवण्यासाठी माझे 11 मंडळ ने यशस्वीरित्या बोलीमध्ये सहभाग घेऊन प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले आहेत.
  • स्त्री टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिय तसेस भारतातील दिग्गज महिला क्रिकेटपटू सहभागी होतील.

ऋतुराज गायकवाडने रचला ‘हा’ अनोखा विक्रम :

  • चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्या सामन्यात चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने दमदार खेळी केली.
  • तर त्याने अर्धशतकी खेळी करत चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
  • विशेष म्हणजे त्याने या सामन्यात एक अनोखा विक्रम रचत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं.
  • तर त्याने 49 चेंडूंमध्ये एक षटकार आणि चार चौकार लगावत 53 धावा केल्या.
  • तसेच त्याने आयपीएलमध्ये 35 डावांत 1205 धावा करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
  • आयपीएलमध्ये 35 डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ऋतुराजने अव्वल स्थान गाठले आहे.

दिनविशेष :

  • 16 1665 मध्ये मध्ये पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्‍नात मुरारबाजी यांचा मृत्यू.
  • अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे 1866 मध्ये 16 मध्ये व्यवहारात आणले.
  • क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना 1899 मध्ये 16 मध्ये फाशी.
  • 1929 मध्ये 16 मध्ये हॉलिवूडच्या अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.
  • सोविएत रशियाचे व्हेनेरा-5 हे मानवविरहित अंतराळयान 1969 मध्ये 16 मध्ये शुक्रावर उतरले.
  • सिक्कीम भारतात 1975 मध्ये 16 मध्ये विलीन झाले.
  • कुवेतमधे स्त्रियांना 2005 मध्ये 16 मध्ये प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.