25 जुलै 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

सुनील गावसकर
सुनील गावसकर

चालू घडामोडी (25 जुलै 2022)

देशात लवकरच सैन्यदलांची संयुक्त कमांड :

 • देशाच्या तिन्ही सैन्यदलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल यांची ‘जॉइंट थिएटर कमांड’ स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिली.
 • त्याचप्रमाणे शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणारा देश ही ओळख पुसत भारताची वाटचाल ही सर्वाधिक शस्त्रनिर्यात करणारा देश होण्याकडे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
 • देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जम्मूतील गुलशन मैदानावर जम्मू आणि काश्मीर पीपल्स फोरमन आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
 • कारगिरमधील विजय ऑपरेशन अंतर्गत झालेल्या संयुक्त मोहिमा लक्षात घेता देशात जॉईन्ट थिएटर कमांडची संकल्पना राबविली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारकडून ध्वज संहितेमध्ये बदल :

 • केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे.
 • आता दिवसरात्र आहे 24 तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे.
  तसेच पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे.
 • ‘आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारने ‘प्रत्येक घरावर तिरंगा’ मोहीम राबण्याची घोषणा केली आहे.
 • तर या मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आहे.
 • भारतीय ध्वज कोड, 2002 मध्ये 20 जुलै 2022 च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरीकांच्या घरी तिरंगा फडकवता येणार आहे.
 • ध्वज संहिता-2002 आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-1971 अंतर्गत राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम सांगण्यात आले आहेत.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात नीरजची रौप्यक्रांती :

 • ऑलिम्पिकविजेत्या नीरज चोप्राने रविवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले.
 • जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष अ‍ॅथलेटिक्सपटू ठरला आहे.
 • तर चौथ्या प्रयत्नात नीरजने सर्वोत्तमी 88.13 मी अंतरावर भाला फेकला.
 • तसेच ही कामगिरी ग्रेनाडाच्या 2019 मधील दोहा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या अँडरसन पीटर्सनंतर दुसऱ्या क्रमांकाची ठरली.
 • भारतीय संघ संयुक्तपणे 28व्या क्रमांकावर आहे.
 • एक रौप्य आणि पाच क्रीडापटू अंतिम फेरीत ही भारताची जागतिक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

इंग्लंडमधील क्रिकेट मैदानाला देण्यात आले भारतीय खेळाडूचे नाव :

 • इंग्लंडमधील एका क्रिकेट मैदानाला भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचे नाव देण्यात आले आहे.
 • इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटला इंग्लंडमध्ये मोठा मान मिळाला आहे.
 • लिसेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावसकर यांचे नाव देण्यात आले आहे.
 • शनिवारी हे नाव देण्यात आले. इंग्लंडमधील एखाद्या क्रिकेट मैदानाला ​​भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 • लिसेस्टर क्रिकेट मैदानाचे नाव बदलण्याची मोहीम भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ यांनी सुरू केली होती.
 • यापूर्वी, अमेरिकेतील केंटकी येथील एका मैदानाला ‘सुनील गावस्कर फील्ड’असे नाव देण्यात आलेले आहे.
 • याशिवाय टांझानियातील जंजीबारमध्येही ‘सुनील गावसकर क्रिकेट स्टेडियम’तयार केले जात आहे.

दिनविशेष :

 • 25 जुलै 1880 हा दिवस समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते ‘गणेश वासुदेव जोशी उर्फ ​​सार्वजनिक काका’ यांचा स्मृतीदिन आहे.
 • किकूने इकेदा यांनी 1908 मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेटचा संशोधन लावला.
 • जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉय ब्राउन यांचा 25 जुलै 1978 मध्ये इंग्लंड येथे जन्म झाला.
 • 25 जुलै 1997 मध्ये के.आर. नारायणन भारताचे 10वे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.
 • वर्ष 2007 मध्ये श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.

इतरांना शेअर करा .......

Leave a Comment