24 जुलै 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (24 जुलै 2022)

स्वातंत्र्यसैनिकांना ‘डिजिटल’अभिवादन करावे :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी देशवासीयांना एका आगळय़ा- वेगळय़ा प्रयत्नांत सहभागी होण्याचे आवाहन केले.
  • प्रत्येक नागरिकाने स्वातंत्र्यसैनिकांना वाहिलेली ‘ऑनलाइन’आदरांजली येथील ‘सेंट्रल पार्क’मध्ये ‘डिजिटल ज्योत’प्रखर करेल.
  • एका ‘ट्वीट’द्वारे मोदी यांनी सांगितले, की दिल्लीच्या ‘सेंट्रल पार्क’मध्ये ‘स्काय बीम लाइट’बसवण्यात आला आहे. प्रत्येक श्रद्धांजली या ‘डिजिटल ज्योती’ची तीव्रता वाढवेल.
  • या अनोख्या प्रयत्नात सहभागी होऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास बळ द्या, असे आवाहन करून मोदी म्हणाले, की ‘डिजिटल ज्योत’ ही भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांना विशेष आदरांजली आहे, ज्यामध्ये लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करू शकतात.
  • त्यांनी या ‘ट्वीट’मध्ये या उपक्रमासाठीची digitaltribute.in. ही लिंकही प्रसृत केली.

मंकीपॉक्सच्या उद्रेकामुळे जागतिक आणीबाणी :

  • जगातील 70 हून अधिक देशांत मंकीपॉक्स आजाराची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शनिवारी जागतिक आणीबाणी जाहीर केली.
  • मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’असून आता जागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले.
  • संपूर्ण जगभर एका साथीचा उद्रेक झाला असून हा रोग नव्या प्रकारांतून वेगाने पसरला आहे. त्याबद्दल आपल्याला अतिशय कमी माहिती आहे.
  • तर अशा परिस्थितीला आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम आणि निकष लागू होतात, असे ट्रेडॉस यांनी स्पष्ट केले.
  • तथापि, मंकीपॉक्स हा रोग अनेक दशकांपासून मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांत ठाण मांडून आहे.
  • परंतु आफ्रिका खंडाबाहेर तो पसरल्याची माहिती मेपर्यंत कोणालाही नव्हती.
  • युरोप, उत्तर अमेरिका आणि अन्यत्र या रोगाचे रुग्ण आढळल्यानंतर त्याची साथ पसरल्याचे लक्षात आले.
  • ‘डब्ल्यूएचओ’ने जागतिक आणीबाणी जाहीर केल्यामुळे ‘मंकीपॉक्स’ची साथ ही असामान्य घटना असल्याचे स्पष्ट झाले.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात अन्नू राणी सातव्या स्थानी :

  • भारताच्या अन्नू राणीला शनिवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या भालाफेक क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
  • तर तिला केवळ ६१.१२ मीटरचे अंतर गाठता आले.
  • जागतिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत खेळणाऱ्या अन्नूने दुसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी केली.
  • मात्र, इतर पाच प्रयत्नांत तिला 60 मीटरचे अंतर पार करण्यात अपयश आले.
  • गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या केलसे-ली बार्बरने 66.91 मी. अंतराची नोंद करत सुवर्णपदक कमावले.

दिनविशेष :

  • 24 जुलै 1998 मध्ये परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.
  • विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची ‘विजयालक्ष्मी सुब्रमण्यम’ भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर बनली.
  • हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म 24 जुलै 1911 मध्ये झाला.
  • 1997 मध्ये माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान झाले.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.