सरकारचा मोठा निर्णय,कोतवाल यांच्या मानधनात भरगोस वाढ,पहा सविस्तर


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

KOTWAL MANDHAN 2023 | कोतवाल मानधन 2023 | KOTWAL GR 2023 | KOTWAL MANDHAN GR 2023 | कोतवाल GR डाउनलोड 2023

महाराष्ट्रातील १२,००० पेक्षा जास्त असलेल्या कोतवाल दादासाठी महाराष्ट्र सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. कोतवालांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोतवालांच्या मानधन मध्ये दुपटीने वाढ करण्यात आले आहे. यापूर्वी कोतवालांना सरकारकडून किती मानधन मिळत होते व इथून पुढे आता कोतवालांना किती मानधन मिळणार आहे. आज आपण याच्या विषयी सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

कोतवालांच्या दादांच्या  मानधनात ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ०७ एप्रि . २०२३ राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे . कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले .महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करत  कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर करताना केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक १७ मार्च , २०२३ रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे .

त्यानुसार चालू सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन ७ हजार ५०० रुपयावरून १५ हजार करण्यात येणार आहे . राज्यातील सर्व १२ हजार ७ ९ ३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे . १५ हजार रुपये इतके मानधन दि . ०१ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे.असा GR प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोतवालांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झालेले दिसून येत आहे. त्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय (GR) 6 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment