18 July 2022 Current Affairs In Marathi | 18 जुलै 2022 चालू घडामोडी

इतरांना शेअर करा .......

कॉ. वृंदाताई करात
कॉ. वृंदाताई करात

चालू घडामोडी (18 जुलै 2022)

कॉ. वृंदाताई करात यांना ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ जाहीर :

  • क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार  चालुवर्षी कॉ. वृंदाताई करात यांना देण्यात येणार आहे.
  • कॉ.करात या पश्चिम बंगाल मधील असून विद्यार्थी दशेपासून SFI. या लढाऊ संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नावर संघर्ष करत आल्या आहेत.
  • दिल्लीमधील कापड गिरणी मजुरांच्या हक्कासाठी कामगार संघटनेच्या माध्यमातून काम केले .
  • 2005 मधे पश्चिम बंगालमधुन त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.
  • ६ ऑगष्ट रोजी विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात प्रा. डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षतेखाली प्राचार्य विश्वास सायनाकर यांचे हस्ते हा पुरस्कार कॉम्रेड वृंदाताई करात याना प्रदान करणेत येणार आहे.
  • मानपत्र , सन्मानचिन्ह , शाल , श्रीफल आणि 21 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी मार्गारेट अल्वांची उमेदवारी जाहीर :

  • विरोधी पक्षांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
  • यासंदर्भात बैठकीनंतर या पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांनी माहिती दिली आहे.
  • त्या केंद्र सरकारमध्ये मंत्री होत्या, गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी कारभार पाहिला आहे. त्या राज्यसभा सदस्य देखील होत्या.
  • विरोधी पक्षांचा अल्वा यांच्या नावाला पाठिंबा असल्याचं शरद पवार म्हणाले.
  • काँग्रेस, डीएमके, सपा, एनसीपी, आरजेडी, शिवसेना, टीआरएस, आरएसव्ही, मणी काँग्रेस, एमडीएमके, सीपीआय, सीपीआयएल, नॅशनल काँग्रेस, आरएलडी अशा एकूण 19 पक्षांचा पाठिंबा अल्वा यांच्या उमेदवारीसाठी मिळाला आहे.

महागाईत ‘जीएसटी’ची भर :

  • केंद्र सरकारने वाढवलेल्या वस्तू आणि सेवाकराची भर पडणार आहे.
  • वेष्टनातील अत्यावश्यक अन्नपदार्थ ते खासगी रुग्णालयांतील उपचार अशा अनेक महत्त्वाच्या बाबी महाग वस्तूंच्या यादीत समाविष्ट होत आहेत.
  • पीठ, पनीर, दही यांसारखे वेष्टनांकित आणि लेबल (खूण पट्टी) लावलेले खाद्यपदार्थ आतापर्यंत ‘जीएसटी’मुक्त होते, परंतु आजपासून त्यांवर पाच टक्के जीएसटी भरावा लागेल.
  • त्याचबरोबर रुग्णालयातील पाच हजारांहून अधिक भाडे असलेल्या खोलीसाठीही पाच टक्के जीएसटी भार रुग्णांवर पडणार आहे. म्हणजे खासगी रुग्णालयांतील उपचारही महाग होणार आहेत.
  • मध्यवर्ती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने जूनमध्ये वस्तू-सेवाकरातील विसंगती दूर करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांवर कर आकारणीचा आणि वाढीचा निर्णय घेतला होता.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात अंजुमला कांस्यपदक :

  • भारताच्या अंजुम मुदगिलने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रविवारी महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
  • अंजुमने अंतिम फेरीत 402.9 गुणांसह तिसरे स्थान मिळवले.
  • जर्मनीच्या अ‍ॅना जॅन्सेनने सुवर्ण आणि इटलीच्या बार्बरा गॅमबारोने रौप्यपदक आपल्या नावे केले.
  • दुसरीकडे, पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स सांघिक गटात संजीव राजपूत, चैन सिंह आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर या भारतीय त्रिकुटाने रौप्यदपक जिंकले.
  • भारतीय नेमबाजांनी या विश्वचषकात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. रविवारी एक कांस्य आणि एक रौप्यपदक मिळवत भारताने एकूण 11 पदकांसह आपले अग्रस्थान कायम राखले आहे.
  • भारताच्या खात्यावर चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्यपदके आहेत.

सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धातपीव्ही सिंधूला विजेतेपद :

  • भारताच्या दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने रविवारी चीनच्या वांग झी यी हिला पराभूत करत सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले.
  • सिंधूने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या वांगला नमवत हंगामातील तिसरे अजिंक्यपद मिळवले.
  • यापूर्वी तिने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती.

बुद्धिबळपटू गुकेशची विक्रमी कामगिरी :

  • भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ली क्वँग लिएमवर विजय नोंदवत स्विर्त्झलॅड येथे सुरू असलेल्या बिल बुद्धिबळ महोत्सवातील ग्रँडमास्टर ट्रायथलॉनमध्ये अग्रस्थान मिळवले.
  • यासह त्याने ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये 2700 एलो गुणांचा टप्पाही पार केला.
  • तर ही कामगिरी करणारा १६ वर्षीय गुकेश सर्वात युवा भारतीय, जगातील तिसरा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे.
  • ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये सामन्यातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची गुणवारी बदलत असते.

हार्दिक पंड्याची व्यंकटेश प्रसादच्या क्लबमध्ये एंट्री :

  • यष्टीरक्षक ऋषभ पंतचे धमाकेदार शतक आणि हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर भारताने मँचेस्टर येथील निर्णायक सामना पाच गडी राखून जिंकला.
  • तसेच दोघांनी मिळून 133 धावांची भागीदारी केली.
  • तर पंड्याने 55 चेंडूत 71 धावा केल्या. यामध्ये 10 चौकारांचा समावेश आहे. याशिवाय त्याने गोलंदाजी करताना चार बळी देखील घेतले होते.
  • एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेट सामन्यात अर्धशतक करून चार बळी मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारतीय संघासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करण्याच्याबाबतीत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
  • मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम व्यंकटेश प्रसाद यांच्या नावावर आहे.

दिनविशेष :

  • 18 जुलै हा ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 मध्ये झाला.
  • 1968 मध्ये कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना झाली.
  • अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 2000 विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म 18 जुलै 1982 रोजी झाला.
  • उद्योगपती गोदरेज यांना 1996 मध्ये जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.

इतरांना शेअर करा .......

Leave a Comment