WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

17 July 2022 Current Affairs In Marathi | 17 जुलै 2022 चालू घडामोडी

इतरांना शेअर करा .......

जगदीप धनकड

चालू घडामोडी (17 जुलै 2022)

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी :

 • भाजपाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए पुरस्कृत उमेदवाराची घोषणा केली आहे.
 • तर या निवडणुकीसाठी भाजपाने जगदीप धनकड, पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल यांना उमेदवारी दिली आहे.
 • जगदीप धनकड हे सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत आहेत.
 • तर या पदावर असताना ममता बॅनर्जी आणि धनकड यांच्यात अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे संघर्ष झालेला पाहायला मिळालेला आहे.
 • भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याच धनकड यांच्या उमेदवारीची आज घोषणा केली.

संसदेच्या आवारात निदर्शनांना मनाई :

 • संसदेच्या आवारात धरणे, निदर्शनांना मनाई करणारा आदेश शुक्रवारी राज्यसभेच्या सचिवालयाने काढला.
 • विरोधकांनी या आदेशावर आक्षेप घेतल्याने नवा वाद निर्माण झाला.
 • संसद भवनाच्या परिसरात यापुढे निदर्शने, धरणे, उपोषण किंवा धार्मिक समारंभ करता येणार नाहीत, असे शुक्रवारी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
 • निदर्शने वा धरणे धरण्यास मनाई करणारे परिपत्रक अधिवेशनाच्या काळात काढले जात असल्याचे सचिवालयातील सूत्रांनी सांगितले.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात ऐश्वर्यला सुवर्ण :

 • भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंहने शनिवारी ‘ISSF’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमधील 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
 • ऐश्वर्यने अंतिम लढतीत 2018च्या युवा ऑलिम्पिक विजेत्या हंगेरीच्या झलान पेकलरला 16-12 असे हरवले.
 • कनिष्ठ विश्वविजेत्या ऐश्वर्यने पात्रता फेरीत 593 गुणांची कमाई केली होती.
 • तसेच हे ऐश्वर्यचे दुसरे विश्वचषक सुवर्णपदक आहे. याआधी त्याने गेल्या वर्षी नवी दिल्लीमध्ये मिळवले होते.
 • तार साखळी सिंगला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 • मध्य प्रदेशच्या ऐश्वर्यने भारताच्या खात्यावर चौथ्या सुवर्णपदकाची भर घातली.
 • पदकतालिकेत आघाडीवर असलेल्या भारताने चार सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण नऊ पदके आतापर्यंत कमावली आहेत.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात साबळे अंतिम फेरीत :

 • महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने अपेक्षेप्रमाणेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरी गाठली.
 • दोहा येथे 2019मध्ये झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या भारताच्या 27 वर्षीय साबळेने तिसऱ्या क्रमांकाच्या शर्यतीत 8:18.75 मिनिटे अशी वेळ नोंदवली.
 • तर स्पर्धेच्या तीन शर्यतींमधील अव्वल तीन स्पर्धक आणि त्यानंतरचे सहा वेगवान धावपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
 • साबळेने जूनमध्ये प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवताना 8:12.48 मिनिटांचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.

दिनविशेष :

 • 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन म्हणून पाळला जातो.
 • 1802 मध्ये मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
 • दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म सन 1930 मध्ये 17 जुलै रोजी झाला.
 • वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे 17 जुलै 1955 रोजी डिस्नेलँड सुरू केले.
 • कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म 17 जुलै 1923 रोजी झाला.

इतरांना शेअर करा .......

Latest Post

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.