WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

9 जून 2022 चालू घडामोडी

इतरांना शेअर करा .......

2मिताली राज

चालू घडामोडी (9 जून, 2022)

‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत भारतीय मुलीचे यश :

 • अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या 14 वर्षीय डो लोगान या भारतीय वंशाच्या मुलीने कडव्या लढतीनंतर यंदाची ‘स्क्रिप्स स्पेिलग बी’ स्पर्धा जिंकली.
 • पहिल्यांदाच स्पर्धेचा निकाल 90 सेकंदांच्या ‘स्पेल ऑफ’(टायब्रेकरद्वारे) लागला.
 • ज्यामध्ये 26 पैकी 22 शब्दांची योग्य स्पेलिंग अचूक सांगत तिने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकला.
 • 2 जूनला घेण्यात आलेल्या ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत अमेरिकेसह जगभरातील 234 स्पर्धकांनी भाग घेतला होईल.
 • ही स्पर्धा जिंकण्यासाठी अखेरीस आठवीत शिकणाऱ्या हरिणी हिने ‘मूर्हेन’ या शब्दाची स्पेलिंग सांगितली. एका सुंदर लहान पक्ष्याचे हे नाव आहे.
 • विशेष म्हणजे या स्पर्धेतील दोन्ही अंतिम स्पर्धक हे भारतीय मूळ वंशाचे होते. उपविजेता विक्रम राजू हासुद्धा भारतीय वंशाचा आहे.
 • ‘स्क्रिप्स स्पेलिंग बी’ स्पर्धा विजेत्या हरिणी हिला 50 हजार डॉलर बक्षीस म्हणून देण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय :

 • मोदी सरकारने देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे.
 • एकूण 17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 पीक वर्षासाठी पिकांचा एमएसपी 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये प्रति क्विंटल केला आहे.
 • त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्यात आला आहे.
 • यावेळी सर्व 14 खरीप पिके आणि त्यांच्या वाणांसह 17 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

आरबीआयची व्याजदरांत वाढ :

 • महागाई दर वाढल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.
 • रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे.
 • यासोबत रेपो रेट 4.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 • एक महिन्याच्या अंतराने रेपो रेटमध्ये करण्यात आलेली ही दुसरी वाढ आहे.
 • रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.

स्थलांतरित मतदार कुठूनही मतदान करू शकणार :

 • स्थलांतरित मतदारांचा सहभाग सुधारण्यासाठी आणि शहरी तसेच दुर्गम भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने रिमोट वोटिंगसाठी मंगळवारी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • निवडणूक आयोगाने म्हटले आहे की स्थलांतरित मतदारांच्या समस्यांचे परीक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आणि ही समिती राजकीय पक्षांचा सल्ला देखील घेईल.
 • विशेष म्हणजे निवडणूक आयोग गेल्या काही वर्षांपासून रिमोट वोटिंगसाठीच्या संकल्पनेवर विचार करत आहे.
 • मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिमोट मतदान सुरू करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने देशभरातील स्थलांतरित कामगारांच्या लोकसंख्येचे मॅपिंग सुरू करण्याची योजना आखली आहे.
 • स्थलांतरित मतदारांच्या समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईलअसे त्यात म्हटले आहे.
 • निवडणूक आयोगाच्या बैठकीत अवघड भागात ईव्हीएम-व्हीव्हीपीएटीच्या सुरक्षित वाहतुकीसाठी अतिरिक्त उपकरणे उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

मितालीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :

 • भारताची दिग्गज क्रिकेटपटू मिताली राजने बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
 • मितालीने 232 एकदिवसीय सामन्यांत 7,805 धावा केल्या आहेत.
 • याचप्रमाणे एकूण 10,868 धावांसह महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकंदर धावा करणारी खेळाडू ठरली आहे.
 • तिने 89 ट्वेंटी20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले, तर आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत तिला केवळ 12 कसोटी सामने खेळायला मिळाले.
 • क्रिकेटच्या या पारंपरिक प्रकारात द्विशतक झळकावणारी ती भारताची एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.
 • मितालीने 2019 मध्येच ट्वेन्टी-20 प्रकारातून निवृत्ती घेतली होती.
 • मितालीने सहा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात महाराष्ट्राला 10 पदके :

 • खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण 10 पदके मिळवली.
 • कुस्ती, ॲथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, वेटलििफ्टगमधील पदकांचा यात समावेश आहे.
 • हरयाणाने बुधवारी 87 पदकांसह अव्वल स्थान गाठले असून, महाराष्ट्र 73 पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.

दिनविशेष :

 • अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना ९ जून १८६६ मध्ये झाली.
 • एडविन आर्मस्ट्राँग यांनी ९ जून १९३५ मध्ये पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसाtरण केले.
 • भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी 9 जून 1964 मध्ये सूत्रे हाती घेतली होती.

इतरांना शेअर करा .......

Latest Post

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.