चालू घडामोडी (जून २६, २०२२)
अमेरिकेत बंदूक हिंसाचारप्रतिबंधक विधेयक मंजूर :
- अमेरिकेतील बहुप्रतीक्षित बंदूक हिंसाचार प्रतिबंधक विधेयकावर अध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी स्वाक्षरी केली.
- अमेरिकेत बेछुट गोळीबाराच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहे.
- त्यामुळे या घटनांच्या प्रतिबंधासाठी वैधानिक तरतूद करण्याच्या मागणीचा दबाव सरकारवर वाढला होता.
- तर या पार्श्वभूमीवर सिनेटरच्या द्विपक्षीय गटास संमत असलेले विधेयक मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला. ‘
- गुरुवारी सिनेटने मंजुरी दिल्यानंतर प्रतिनिधी सभागृहाने शुक्रवारी या विधेयकास अंतिम मंजुरी दिली.
- शनिवारी युरोपमधील दोन शिखर परिषदेसाठी वॉशिंग्टन सोडण्यापूर्वी अध्यक्ष बायडेन यांनी त्यास मंजुरी दिली.
- तसेच या कायदेशीर तरतुदीमुळे बंदूक खरेदी करणाऱ्या अल्पवयीनांची पार्श्वभूमी, त्यांच्या माहितीची खातरजमा करण्याची प्रक्रिया अधिक कठोर होणार आहे.
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धात अभिषेक-ज्योती जोडीला सुवर्ण :
- अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या भारतीय जोडीने शनिवारी विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यातील कंपाऊंड प्रकाराच्या मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले.
- अभिषेक-ज्योती या आघाडीच्या जोडीने फ्रान्सच्या जिन बोल्च आणि 48 वर्षीय ऑलिम्पिक पदकविजेती सोफी डॉडमॉन्ट या फ्रेंच जोडीला अंतिम लढतीत 152-149 असे नमवले.
- यासह त्यांनी भारताला कंपाऊंड मिश्र सांघिक गटातील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
- भारताची सर्वात यशस्वी कंपाऊंड जोडी असलेल्या अभिषेक आणि ज्योतीने गेल्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक कमावले होते.
- तर त्यांनी यंदा सुवर्णपदक पटकावत भारताला या स्पर्धेतील एकूण दुसरे पदक मिळवून दिले आहे.
- दीपिका कुमारी, अंकिता भाकट आणि सिमरनजीत कौर या भारतीय त्रिकुटाने यापूर्वीच महिलांच्या रीकव्र्ह सांघिक गटाची अंतिम फेरी गाठत आपले पदक निश्चित केले आहे.
भारतीय महिला संघाला विजयी आघाडी :
- कर्णधार हरमनप्रीत कौरची अष्टपैलू कामगिरी आणि सलामीवीर स्मृती मानधनाच्या अप्रतिम फलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने शनिवारी दुसऱ्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर पाच गडी व पाच चेंडू राखून मात केली.
- यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
- डाम्बुला येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने दिलेले 126 धावांचे आव्हान भारताने 19.1 षटकांत पूर्ण केले.
दिनविशेष :
- 26 जून 1819 मध्ये सायकलचे पेटंट देण्यात आले आहे.
- सोमालिया देशाला 26 जून 1960 मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 26 जून 1960 मध्ये मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
- शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे 26 जून 1999 मध्ये चलनात आले.
- 26 जून 1874 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला.