डॉ. मुहम्मद आझम यांना साहित्य अकादमीचा ‘भाषा सन्मान पुरस्कार’ :
मराठी व दखनी भाषेच्या स्नेहसंबंधावर संशोधनात्मक प्रकाशझोत टाकणारे प्रा. मुहम्मद आझम डॉ यांना साहित्य अकादमीचा ‘भाषा सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय प्रा. आझम यांना शुक्रवारी कळवला आहे.
प्रा. आझम अहमदनगर महाविद्यालयातील हिंदी, उर्दू व फारसी भाषेचे सेवानिवृत्त विभागप्रमुख आहेत.
त्यांचा ‘कदमराव पद्माराव- दखनी-दखनी-मराठी ठेका’ मधील पहिले काव्यात्मक काम हा संशोधनात्मक ग्रंथ सन 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केला.
त्यांची यापूर्वी ‘सुफी तत्त्वज्ञान स्वरूप व चिंतन’ ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा त्रिखंडात्मक, तसेच ‘नमाज-रहस्य व तत्त्वज्ञान’ असे तीन संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
निती आयोगाच्या ‘सीईओ’पदी परमेश्वरन अय्यर :
निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) निवृत्त सनदी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी घेतला.
अय्यर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) 1981 च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त अधिकारी असून ते अमिताभ कांत यांची जागा घेतील.
ते निती आयोगाचे तिसरे सीईओ असतील.
भारत सरकारची सार्वजनिक धोरणे ठरविण्याचे काम निती आयोग करतो.
निती आयोगाचे विद्यमान सीईओ कांत यांचा कार्यकाळ 30 जून 2022 रोजी संपुष्टात येत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अय्यर यांच्या नियुक्तीला दोन वर्षे किंवा पुढील आदेश मिळेपर्यंतच्या कालावधीपर्यंत मंजुरी दिली आहे.
अमेरिकेत महिलांचा गर्भपाताचा अधिकार रद्द :
अमेरिकेत सुमारे 50 वर्षांपासून गर्भपाताला असलेले घटनात्मक संरक्षण शुक्रवारी संपुष्टात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महिलांचा गर्भपाताचा अधिकार काढून घेतला असून साधारण निम्म्या राज्यांमध्ये आता गर्भपात बंदीची शक्यता आहे.
गर्भपाताला घटनात्मक अधिकार ठरवणारा आपला 50 वर्षे जुना निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.
ऐतिहासिक रो विरुद्ध वेड निर्णय रद्द करणार असल्याबाबतची कागदपत्रे फुटल्यानंतर काही आठवडय़ातच सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
या निर्णयामुळे अमेरिकेत गर्भपाताच्या अधिकारांचे रूपांतर होईल आणि राज्ये त्याबाबतच्या प्रक्रियेवर बंदी घालू शकतील.
द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल :
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली आहे. येत्या 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
एनडीए आणि विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल होत्या. आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत ज्या भारताच्या सर्वोच्चपदाची निवडणूक लढवत आहेत.
आठ वर्षांच्या मुलाने 18 मिनिटांत पार केली यमुना :
शिवांश मोहिले नावाच्या या आठ वर्षांच्या मुलाने यमुनेच्या पाण्यात उतरून विक्रम केला आहे.
त्याने अवघ्या 18 मिनिटांत यमुना नदी पार केली आहे.
18 मिनिटांमध्ये यमुना पार करणारा शिवांश पहिलाच मुलगा ठरला आहे.
त्यापूर्वी, आराध्या श्रीवास्तव नावाच्या मुलाने 22 मिनिटांमध्ये यमुना पार केली होती.
स्पेनचा अल्वारो वॅझकेझ खेळणार विराट कोहलीच्या संघात :
फुटबॉलची लोकप्रियता वाढवण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आयपीएलच्या धर्तीवर ‘इंडियन सुपर लीग’ (आयएसएल) स्पर्धेची सुरुवात केली आहे.
या स्पर्धेमुळे विविध देशांतील प्रतिभावान फुटबॉलपटू भारतामध्ये येऊन फुटबॉल खेळताना दिसतात.
नुकतेच विराट कोहलीची सहमालकी असलेला संघ, एफसी गोवाने स्पेनचा प्रतिभावंत फुटबॉलपटू अल्वारो वॅझकेझ याला दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे.
त्यामुळे 2024 च्या हंगामापर्यंत अल्वारो गोव्याच्या ऑरेंज जर्सीमध्ये खेळताना दिसेल.
स्ट्रायकर असलेला अल्वारो यापूर्वी केरळ ब्लास्टर्स या संघाकडून खेळत होता.
दिनविशेष :
25 जून हा दिवस ‘जागतिक कोड त्वचारोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा 25 जून 1918 मध्ये जारी केला.
25 जून 1947 रोजी द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 मध्ये देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली होती.
1983 मध्ये भारताने प्रथम क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.
All material appearing on the {GSESTUDYPOINT.IN} website ("content") is protected by copyright under INDIA Copyright laws and is the property of {GSESTUDYPOINT.IN}. You may not copy, reproduce, distribute, publish, display, perform, modify, create derivative works, transmit, or in any way exploit any such content, nor may you distribute any part of this content over any network, including a local area network, sell or offer it for sale, or use such content to construct any kind of database.