21 जुलै 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

 

चालू घडामोडी (21 जुलै 2022)

महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास परवानगी :

  • ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला असल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाला आह़े.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 11 मार्च रोजी बांठिया आयोग स्थापन केला होता़
  • तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रीपल टेस्टची पूर्तता देखील करण्यात आली आहे.
  • त्यामुळे आता महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
  • तसेच येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत.
  • महाराष्ट्रात अनेक महानगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
  • तर या निवडणुका ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर व्हाव्यात, अशी भूमिका तत्कालीन राज्य सरकारने घेतली होती.
  • त्यामुळे मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

१५ ऑगस्टपूर्वी बिबट्याचे भारतात आगमन

  • 1952 मध्ये भारतातून विलुप्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या चित्त्याला पुन्हा आणण्यासाठी भारत आणि नामिबियादरम्यान बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला.
  • जगातील सर्वात वेगवान सस्तन प्राणी म्हणून ओळख असलेल्या या प्राण्याला मध्य प्रदेशातील कुनो पालपूर अभयारण्यात मुक्त करण्यात येणार आहे.
  • चित्त्यांच्या पहिल्या तुकडीत चार नर चित्त्यांसह काही माद्यांचा समावेश असून त्यांचे ऑगस्टमध्ये नामिबियातून आगमन होणार आहे.
  • नामिबियात जगातील सर्वात अधिक चित्त्यांची संख्या आहे.
  • तर 1948 मध्ये छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील सालच्या जंगलात अखेरचा मृत चित्ता सापडला होता.

इंधन निर्यातीवरील ‘विंडफॉल’ करात कपात :

  • चालू महिन्यात पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या (एटीएफ) निर्यातीवरील कर आणि देशांतर्गत तेल वितरण कंपन्यांच्या नफ्यावर लादलेला अतिरिक्त ‘विंड फॉल’ करभार कमी केल्याची घोषणा केंद्र सरकारने बुधवारी केली.
  • जूनमध्ये शिगेला पोहोचलेल्या खनिज तेलाच्या किमतीतील अलीकडच्या तीव्र घसरणीच्या बरोबरीने पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या (एटीएफ) शुद्धीकरणातून तेल कंपन्यांच्या नफ्याच्या मर्यादेत (रिफायिनग मार्जिन) मोठी घसरण झाली असून, तेल कंपन्यांनी आधीच्या महिन्यांमध्ये कमावलेल्या भरमसाट नफ्यालाही लक्षणीय ओहोटी लागली आहे.
  • तर हे पाहता 1 जुलैपासून लागू झालेल्या ‘विंडफॉल’ कराचा पहिल्या महिन्याभरातच फेरविचार करून कपात करण्यात आली आहे.
  • पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर 6 रुपये आकारण्यात येणारे निर्यात शुल्क पूर्णपणे रद्दबातल करण्यात आले असून, डिझेल आणि विमान इंधनाच्या (एटीएफ) निर्यातीवरील कर प्रति लिटर 2 रुपयांनी कमी करण्यात आला आहे.
  • आता डिझेल आणि एटीएफवर अनुक्रमे 11 रुपये आणि 4 रुपये निर्यात कर आकारण्यात येईल.

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती :

  • श्रीलंकेमध्ये नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे.
  • तर या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत.
  • तसेच मागील 44 वर्षात प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.
  • काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लस अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते.
  • तर 225 सदस्य असणाऱ्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी 113 मतांची आवश्यकता होती. रानिल विक्रमसिंघे यांना स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांना 134 मतं मिळाली आहे.

आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धात निकिताला रौप्य :

  • आशियाई युवा वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निकिता कमलाकरने बुधवारी रौप्यपदकाची कमाई केली.
  • ताश्कंदयेथे सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत निकिताने 55 किलो वजनी गटात 68 किलो स्नॅच आणि 95 किलो क्लीन-जर्क असे एकूण 163 किलो वजन उचलले.
  • तर गेल्या महिन्यात मेक्सिको येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत निकिताचे पदक थोडक्यात हुकले होते.

दिनविशेष :

  • या. माजी 356 मध्ये जगातील सात आश्चर्याँपैकी एक ‘एफिसस आर्टेमिसचे मंदिर’ नष्ट झाले.
  • 2002 मध्ये जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्‍या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
  • स्वातंत्र्यसैनिक तसेच रोजगार हमी योजनेचे जनक व्ही.एस. पान यांचा जन्म 21 जुलै 1910 मध्ये झाला.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment