22 जुलै 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चेतेश्वर पुजारा

चालू घडामोडी (22 जुलै 2022)

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती :

  • देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे.
  • तर या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत.
  • तसेच या निवडणुकीसाठी 99 टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता.
  • देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 100 टक्के मतदान पार पडले होते.
  • तर या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे.
  • त्या येत्या 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील.
  • तसेच याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता.

गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती :

  • अदानी ग्रुप’चे प्रमुख गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
  • तर त्यांची एकूण संपत्ती 115.4 अब्ज डॉलर असून त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि एकेकाळचे जगातील सर्वात धनाढय़ असलेल्या बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे.
  • अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे.
  • ‘फोर्ब्स’ने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे संस्थापक एलोन मस्क हे या यादीत अव्वल स्थानावर आहेत.
  • बर्नाड अ‍ॅर्नो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुई व्हिटॉन दुसऱ्या तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बझ तिसऱ्या क्रमांकावर आहेत क्रमांकावर आहेत.
  • चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी मुकेश अंबानीना मागे सोडले.

राजस्थानात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार :

  • देशात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
  • यात राजस्थान प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.
  • राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून ही माहिती समोर आली असून देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
  • इतर गुन्हयांमध्ये महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या बाबतीत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद उत्तर प्रदेशात झाली आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात अन्नू अंतिम फेरीत :

  • भारताची भालाफेकपटू अन्नू राणीने गुरुवारी अखेरच्या प्रयत्नात 59.60 मीटर अंतरावर भाला फेकून जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
  • अन्नूला ब-गटाच्या पात्रता फेरीत पाचवा क्रमांक तर दोन्ही गटांमध्ये मिळवून आठवा क्रमांक मिळाला.
  • पात्रता फेऱ्यांमधील दोन्ही गटांतून 62.50 मीटर अंतर गाठणाऱ्या तीन खेळाडूंसह सर्वोत्तम 12 जणींना अंतिम फेरीत स्थान मिळवता आले.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन UAE मध्ये होणार :

  • आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आता श्रीलंकेऐवजी संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणार आहे.
  • तशी माहिती बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी दिली आहे.
  • याआधी ही स्पर्धा श्रीलंका येथे खेळवली जाणार होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून या देशावर राजकीय तसेच आर्थिक संकट ओढावले आहे.
  • याच कारणामुळे ही स्पर्धा आता श्रीलंका ऐवजी यूएई येथे खेळवली जाणार आहे.
  • दरम्यान, वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 26 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

लॉर्ड्सवर द्विशतक ठोकणारा चेतेश्वर पुजारा पहिला भारतीय :

  • भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारा ससेक्स क्रिकेट क्लबकडून काउंटी क्रिकेट खेळत आहे.
  • सध्या ससेक्स आणि मिडलसेक्स क्रिकेट क्लब दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती सामना सुरू आहे.
  • तर या सामन्यात पुजाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
  • त्याने बुधवारी ससेक्ससाठी हंगामातील तिसरे द्विशतक झळकावले.
  • तसेच गेल्या 108 वर्षांमध्ये ससेक्ससाठी अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
  • त्याचबरोबर क्रिकेटची पंढरी अशी ओळख असणाऱ्या लॉर्ड्सवर द्विशतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

दिनविशेष :

  • 22 जुलै 1908 मध्ये देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना 6वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती.
  • पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची 22 जुलै 1944 मध्ये सुरुवात झाली.
  • 22 जुलै 1898 मध्ये शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म झाला.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.