4 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी | 4 August 2022 Current Affairs


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन (SSLV)
लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन (SSLV)

चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2022)

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक SSLV :

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे.
  • लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन (SSLV)असं या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून कमी वजनाचे उपग्रह, 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे.
  • तसेच हा नवा प्रक्षेपक एका उड्डाणात एकुण 500 किलो वजनाचे उपग्रह 500 किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करु शकणार आहे.
  • यामुळे मिनी, मायक्रो आणि नॅनो उपग्रह प्रक्षेपित करणे शक्य होणार आहे.
  • इस्त्रोचा अवघ्या 100 टन वजनाचा SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांची टीम अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करु शकते.
  • यामुळे SSLV प्रक्षेपणाच्या माध्यमातून इस्त्रोची मनुष्यबळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.
  • SSLV प्रक्षेपकाची उंची 34 मीटर असून व्यास दोन मीटर एवढा आहे. येत्या सात ऑगस्टला SSLVचे पहिले प्रक्षेपण सकाळी नऊ वाजून 18 मिनीटांनी श्रीहरीकोटा इथून होणार आहे.
  • SSLV चे पहिले उड्डाण असल्याने हे प्रायोगिक उड्डाण असणार आहे, या मोहिमेला इस्त्रोने SSLV-D1 असं नाव दिलं आहे.
  • या मोहिमेच्या माध्यमातून 135 किलोग्रॅम वजनाचा EOS 02 नावाचा मायक्रो सॅटेलाईट ( microsatellite) 350 किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केला जाणार आहे.
  • तर या उपग्रहाचा कार्यकाल हा 10 महिने निश्चित करण्यात आला असून जमिनीची छायाचित्रे काढण्याचे काम करणार आहे.
  • तर ग्रामीण भागातील 750 विद्यार्थ्यांनींनी बनवलेला आठ किलोग्रॅम वजनाचा AzaadiSAT नावाचा उपग्रहही प्रक्षेपित केला जाणार आहे.

जागतिक वनक्षेत्रात 81.7 दशलक्ष हेक्टरची घट :

  • भारतात जंगलात लागणारी आग आणि विकास वनक्षेत्र कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
  • जागतिक पातळीवर देखील वनक्षेत्रात मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे.
  • गेल्या सहा दशकात जागतिक वनक्षेत्र 81.7 दशलक्ष हेक्टरने कमी झाले आहे.
  • ‘जर्नल एन्व्हायर्नमेंटल रिसर्च लेटर्स’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
  • पर्यावरणातील बदल आणि जैवविविधता हानी यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी वनपरिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावतात.

वैयक्तिक माहिती-विदा संरक्षण विधेयक मागे :

  • माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढय़ कंपन्यांनी आक्षेप घेतलेले आणि केंद्र सरकारला नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा वापर करण्यासाठी मोकळे रान देणारे ‘वैयक्तिक गोपनीय माहिती-विदा संरक्षण’केंद्र सरकारने बुधवारी हे विधेयक मागे घेतले.
  • संयुक्त संसदीय समितीने 81 सुधारणा सुचवल्यानंतर, केंद्रीय माहिती- तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत हे विधेयक मागे घेत असल्याचा प्रस्ताव मांडला़ त्याला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली.
  • तर काळाशी सुसंगत नवे विधेयक आणले जाईलअसे वैष्णव यांनी लोकसभेतील निवेदनात स्पष्ट केले.
  • गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा निकाल देताना 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला वैयक्तिक माहिती-विदा संरक्षणाचा कायदा करण्याची सूचना केली होती.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात बॅडमिंटन संघाला रौप्य :

  • राष्ट्रकुल बॅडिमटन स्पर्धेत भारताला सांघिक रौप्यपदकावर त्यांना समाधान वाटू लागले.
  • तर अंतिम लढतीत भारताला मलेशियाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला.
  • तर एकमेव विजय ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूलाच मिळविता आला.
  • याआधी भारतीय बॅडमिंटन संघानं 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.

ज्युदोमध्ये तुलिका मानने पटकावले रौप्य :

  • भारतीय स्त्री ज्युदोपटू तुलिका मानचे बुधवारी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवले.
  • महिलांच्या गटाट यांचे वजन 78 किलो आहे सुवर्णपदकाच्या सामन्यात तिचा पराभव झाला.
  • अंतिम फेरीत स्कॉटलंडची गतविजेती अॅडलिंग्टनकडून तुलिका पराभूत झाली.
  • 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई :

  • स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय वेटलिफ्टिंगपटू लव्हप्रीत सिंगने 109 किलो वजनी गटात कांस्यपदक केली आहे.
  • हा संपूर्ण भारत आहे 14वे तर वेटलिफ्टिंगमधील नववे पदक ठरले आहे.
  • त्याने स्नॅचमध्ये 163 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण 355 किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकले.
  • कॅमेरूनच्या ज्युनियर पेरीस्लेक्सने 161 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर सामोनच्या जॅक हिटिला याने एकूण 358 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.

दिनविशेष :

  • कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 मध्ये झाला.
  • पतंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1863 मध्ये झाला.
  • साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम आणि एन.सी. फडके यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 मध्ये झाला.
  • 1956 मध्ये भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
  • मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सन 2001 मध्ये 4 ऑगस्ट रोजी स्थापन झाली.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment