5 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी | 5 August 2022 Current Affairs

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

न्यायमूर्ती उदय लळीत

चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2022)

न्यायमूर्ती उदय लळीत देशाचे 49 वे सरन्यायाधीश होणार :

  • सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारी देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.
  • सरन्यायाधीश ए. व्ही. रमणा यांनी स्वतः गुरुवारी केंद्र सरकारला दिलेल्या आपल्या 3 ऑगस्टच्या शिफारस पत्राची प्रत न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्याकडे सोपवली.
  • a व्ही.एस.एस. रमणा 26 ऑगस्टला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत.
  • त्यांच्यानंतर लळीत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती लळीत 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील.
  • तेही 8 नोव्हेंबरला निवृत्त होण्याआधी अशाचप्रकारे पुढील सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस करतील.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात तुलिकाला रौप्य :

  • भारताची जुडोप्टू चित्रकार राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी यशासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
  • स्कॉटलंडच्या सारा अडिलग्टनने 78 किलो वजनी गटाच्या लढतीत तिचा पराभव केला.
  • तुलना करा एकाच दिवसात दोन लढती जिंकताना अंतिम फेरी गाठली होती. या दोन्ही
  • तर या स्पर्धेतील भारताचे ज्युडो प्रकारातील हे तिसरे पदक ठरले.

फुटबॉल महासंघाच्या निवडणुकांमध्ये खेळाडूंना मतदानाचे समान हक्क :

  • पदाधिकारी आणि राजकारण्यांनाच नाही, तर मैदानावर आपल्या यशस्वी कामगिरीने खेळांना लोकप्रियता मिळवून देणाऱ्या खेळाडूंना प्रशासकीय निर्णयांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असला पाहिजे.
  • त्यामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची अंतरिम कार्यकारी समिती निवडण्यासाठी 36 राज्य संघटनांप्रमाणेच 36 माजी नामांकित फुटबॉलपटू मतदानाचा हक्क बजावतील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
  • त्यामुळे निवडणुकांमध्ये खेळाडूंना मतदानाचे समान हक्क असणार आहेत.
  • खेळाडूंच्या मैदानावरील कामगिरीमुळे खेळांना चालना मिळते. त्यामुळे प्रशासकीय निर्णय घेताना त्यांचे मत जाणून घेतल्यास खेळांचा फायदाच होईल, असे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि जी. बे. पार्डिवाला यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

धावपटू हिमा दास उपांत्य फेरीत :

  • धावपटू हिमा दासने उपांत्य फेरीत तर मंजू बाला हिने हातोडा फेकीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
  • त्यामुळे भारताला आणखी दोन पदके मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
  • भारताची स्टार धावपटू हिमा दासने २३.४३ सेकंदांची वेळ नोंदवत महिलांच्या 200 मीटर स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
  • 22 वर्षीय हिमाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती.
  • तर झांबियाच्या ऱ्होडा जोब्वूने 23.85 सेकंदांचा वेळ नोंदवून दुसरे स्थान पटकावले तर युगांडाच्या जेसेंट न्यामहुंगेने 24.07 च्या वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

स्मृती मंधानाच्या नावे नवा विश्वविक्रम :

  • भारतीय महिला क्रिकेट संघातील सलामीवीर स्मृती मंधानाला धडाकेबाज फलंदाजी करणारी खेळाडू म्हणून ओळखले जाते.
  • सध्या बर्मिंघम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही ती चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत आहे.
  • बुधवारी या स्पर्धेतील दहवा सामना भारत आणि बार्बाडोस या दोन देशांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात मंधाना चांगली कामगिरी करू शकली नाही.
  • मात्र तिने या सामन्यात पाच धावा करून स्वत:च्या नावावर विश्वविक्रम नोंदवला आहे.
  • सलामीवीर म्हणून टी-20 सामन्यांत 2000 धावा करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
  • तर या कामगिरीसह ती भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.

उंच उडी, ज्युडो, वेटलिफ्टिंग आणि स्क्वॉशमध्ये केली पदकांची कमाई :

  • भारतीय खेळाडूंनी एकाच दिवसात चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये चार पदकांची कमाई केली आहे.
  • विशेष म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच भारताला उंच उडी प्रकारामध्ये तेजस्वीन शंकरने कांस्य पदक पटकावत पदकाची कमाई करुन दिलीय.
  • याचप्रमाणे वेटलिफ्टिंगमध्येही भारताच्या गुरदीप सिंगने कांस्य पदक पटाकवलं आहे
  • तर महिलांच्या 78 किलो वजनी गटात महिला ज्युडोपटू तुलिका मानने रौप्य पदकावर नाव कोरलं.
  • याचप्रमाणे स्क्वॉशमध्ये सौरभ घोषालने भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली.

दिनविशेष :

  • 5 ऑगस्ट 1914 ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.
  • नेल्सन मंडेला यांना 5 ऑगस्ट 1962 मध्ये तुरुंगात टाकण्यात आले.
  • 5 ऑगस्ट 1962 मध्ये कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
  • चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा 5 ऑगस्ट 1930 मध्ये जन्म झाला.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.