CURRENT AFFAIRS IN MARATHI
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

30 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI

इतरांना शेअर करा .......

30 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS

प्रश्न 1. युनायटेड किंगडमच्या वेस्ट मिडलँड्समधील कोव्हेंट्री या शहराने कोणाची नवीन लॉर्ड महापौर म्हणून नियुक्ती केली आहे ?
उत्तर – जसवंत सिंग बिर्डी.

 • भारतीय वंशाचे शीख कौन्सिलर म्हणून, बर्डी यांची नियुक्ती शहराच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

प्रश्न 2. नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी केंद्र नवीन किती रुपयाचे नाणे लॉन्च केले आहे ?
उत्तर – 75 रु.

 • भारताच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ अर्थ मंत्रालयाने विशेष ₹75 चे नाणे लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
 • भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं रविवारी, 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाण्याचं अनावरण केले.

प्रश्न 3. अबू धाबी येथे आयोजित इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (IIFA) 2023 मध्ये कोणी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला ?
उत्तर – हृतिक रोशन आणि आलिया भट्ट.

 • IIFA पुरस्कार 2023 - कमल हसन यांना आयफा 2023 मध्ये भारतीय चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • ब्रह्मास्त्र भाग एक - शिवाने आयफा 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (महिला), आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) यासह अनेक पुरस्कार जिंकले.
 • बाबिल खानला कला चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) पुरस्कार मिळाला.
 • झोका अराउंड द कॉर्नरमधील तिच्या अभिनयासाठी खुशाली कुमारला सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला) पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • अनिल कपूरला जग जुग्ग जीयो या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा (पुरुष) पुरस्कार मिळाला.

प्रश्न 4. IIFA 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला कोणाला मिळाला ?
उत्तर – आर. माधवन ( चित्रपट – रॉकेट्री: द नंबी इफेक्ट )

प्रश्न 5. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ कोणी शपथ घेतल ?
उत्तर – न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धानुका.

 • महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायमूर्ती धानुका यांना पदाची शपथ दिली.
 • वयाच्या ६२ व्या वर्षी ते ३० मे रोजी निवृत्त होतील आणि त्यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून ३ दिवसांचा कार्यकाळ असेल.

प्रश्न 1. केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? ?
उत्तर – प्रवीण कुमार श्रीवास्तव.

 • प्रवीण कुमार श्रीवास्तव यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ घेतली.
 • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली.
 • श्रीवास्तव हे आसाम - मेघालय केडरचे 1988 बॅचचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.

प्रश्न 6. मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली ?
उत्तर – न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला.

प्रश्न  7. IPL 2023 चा विजेता संघ कोणता ठरला?
उत्तर – चेन्नई सुपर किंग ( उपविजेता – गुजरात टायटन्स )

प्रश्न  8. IPL 2023 चा ऑरेंज कॅप चा मानकरी कोण ठरला?
उत्तर – शुभमन गिल.

प्रश्न  9. IPL 2023 चा पर्पल कॅप चा मानकरी कोण ठरला?
उत्तर – मोहम्मद शामी.

प्रश्न  10. IPL 2023 चा पहिला आणि शेवटचा सामना कोणत्या स्टेडियमवर खेळवण्यात आला ?
उत्तर – नरेंद्र मोदी स्टेडियम ( अहमदाबाद )

प्रश्न  11. ‘आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक 2023 दिन’ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – 29 मे.

प्रश्न  12. तय्यब एर्दोगान यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे?
उत्तर – तुर्की

प्रश्न  13. ‘वांद्रे वर्सोवा सागरी सेतू’चे नाव काय आहे?
उत्तर – व्ही. डी. सावरकर

प्रश्न  14. कोणता देश अलीकडेच अल्कोहोलवर आरोग्यविषयक इशारे लागू करणारा दुसरा देश बनला आहे?
उत्तर – आईसलँड ( पहिला देश आयर्लंड होता )

प्रश्न  15. अलीकडेच 57 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर – दामोदर मोजो.

30 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI


इतरांना शेअर करा .......

Latest Post

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.