WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

25 मे 2022 चालू घडामोडी

इतरांना शेअर करा .......

 

चालू घडामोडी (२५ मे २०२२)

भारत-अमेरिकेची प्रगत संरक्षण भागीदारी :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची मंगळवारी भेट झाली.
  • दोन्ही देशांनी त्यांच्या अग्रगण्य सुरक्षा दलांसाठी विकसित होणाऱ्या तांत्रिकदृष्टय़ा प्रगत व गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानात सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाच्या भागीदारीची घोषणा या वेळी केली.
  • मोदी व बायडेन या दोन्ही नेत्यांनी या वेळी अधिक समृद्ध, संपन्न, सुसंवादी, सुरक्षित, मुक्त व परस्परांशी दृढ संबंध असलेल्या विश्वासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला.
  • जपानमध्ये भारत-अमेरिका-ऑस्ट्रेलिया व जपानदरम्यान ‘चतुर्भुज’ परिषद सुरू आहे.
  • तर या वेळी भारत-अमेरिकेदरम्यानच्या दीर्घकालीन लस कृती कार्यक्रमास 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
  • संयुक्त सैनिक दलांत भारताचा समावेश करण्याचे ‘अमेरिकन अध्यक्ष यांचे निवास स्थान’तर्फे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आले.

सुपरबेट पोलंड बुद्धिबळ स्पर्धात आनंद संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी :

  • भारताचा पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सुपरबेट जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) पोलंड बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले.
  • आनंदने अतिजलद विभागात सोमवारी तीन विजयांची नोंद केली.
  • तर त्याने 27व्या आणि अखेरच्या फेरीत रादोस्लाव्ह वोस्ताजेकला (पोलंड) पराभूत केले.
  • तसेच त्याने रिचर्ड रॅपपोर्ट (हंगेरी) आणि किरिल शिव्हचेंको (युक्रेन) यांच्यावरही मात केली.
  • मात्र, त्याला तीन सामन्यांत बरोबरीवर समाधान मानावे लागले आणि त्याने तीन सामने गमावले. त्यामुळे या स्पर्धेच्या जेतेपदापासून त्याला वंचित राहावे लागले.
  • पोलंडच्या यान-क्रिस्टोफ डुडाने 24 गुणांसह या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

आशिया चषक हॉकी स्पर्धात जपानकडून भारताचा पराभव :

  • सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या बरोबरीनंतर पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला मंगळवारी दुसऱ्या सामन्यात जपानकडून 2-5 अशा मोठय़ा फरकाने पराभव पत्करावा लागला.
  • त्यामुळे या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताचा मार्ग आता खडतर झाला आहे.
  • भारताचा पुढील सामना 26 मे रोजी इंडोनेशियाशी होणार आहे.
  • तर बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय अनिवार्य असून त्यांना अन्य निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.

चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धात प्रज्ञानंदचा उपांत्य फेरीत प्रवेश :

  • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने चीनच्या वे यीला 2.5-1.5 असे नमवत चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
  • 16 वर्षीय प्रज्ञानंदचा उपांत्य फेरीत अनिश गिरीशी (हॉलंड) सामना होईल.
  • अन्य उपांत्य लढतीत, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनपुढे चीनच्या डिंग लिरेनचे आव्हान असेल.
  • गिरी आणि कार्लसन यांनी उपांत्यपूर्व फेरीत अनुक्रमे आर्यन टोरी (नॉर्वे) आणि डेव्हिड अ‍ॅन्टोन गुजारो (स्पेन) यांचा पराभव केला.

दिनविशेष :

  • 25 इंच : आफ्रिकन मुक्ती दिन
  • शिवाजी महाराज आग्रा येथे 1666 मध्ये 25 मध्ये नजरकैदेत होते.
  • क्रांतिकारकएक रास बिहारी घोष यांचा जन्म सन 1886 मध्ये 25 मे रोजी झाला.
  • स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा 1899 मध्ये 25 रोजी जन्म झाला.
  • कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्‍च शिखर प्रथमच 1955 मध्ये 25 मध्ये जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
  • चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी 1977 मध्ये 25 रोजी उठवली. सुमारे 10 वर्षे ही बंदी अमलात होती.
  • प्रख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना 1991चा ज्ञानपीठ पुरस्कार 1992 मध्ये 25 रोजी जाहीर झाला.

इतरांना शेअर करा .......

Latest Post

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.