30 जून 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

उद्धव ठाकरें
उद्धव ठाकरें

चालू घडामोडी (३० जून २०२२)

भारतीय बनावटीच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी :

  • संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या पूर्ण भारतीय बनावटीच्या ‘लेसर गाईडेड’ रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची (लेसर गायडेड अँटीटँक गायडेड मिसाईल-एटीजीएम) भारतीय लष्कराच्या वतीने नगर शहराजवळील ह्णकेके रेंजह्णह्ण या युद्धसराव क्षेत्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • सुमारे नऊ महिन्यांपूर्वी दूर अंतरावरील लक्ष्याचा भेद करण्याची चाचणी याच सराव क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर आता जवळच्या अंतरासाठी घेण्यात आलेली ही चाचणीही यशस्वी झाली आहे.
  • भारतीय लष्करात मुख्य लढाऊ वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अर्जुन’ या रणगाडय़ावरून या चाचणीसाठी ‘एटीजीएम’ डागण्यात आले.
  • केके युद्ध सर्वक्षेत्र लष्कराच्या ह्णआर्मर्ड कार्प्स अँड स्कूल (एसीसी अँड एस) या रणगाडा प्रशिक्षण केंद्राच्या अखत्यारीत नगर शहरापासून सुमारे 20 किमी. अंतरावर आहे.
  • याच सराव क्षेत्रात पूर्वी अर्जून रणगाडय़ाच्याही चाचण्या घेण्यात आल्या होत्या. आता अर्जुनवरील 120 मिमी.च्या तोफेसाठी चाचण्या सुरू आहेत.
  • ‘एटीजीएम’ची चाचणी घेण्यात आली. यावेळी एटीजीएम क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेत आपली परिणामकारकता दाखवून दिली.
  • रणगाडय़ाच्या सुरक्षेसाठी ‘एक्सल्पोजिव्ह रिअ‍ॅक्टिव आर्मर’ (इरा) तंत्र वापरले जाते.
  • त्याला भेदण्यासाठी ह्णएटीजीएमह्णह्णवर ह्णहाय एक्सप्लोजिव्ह अँटीटँक (हीट) बसवले गेले आहेत.

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव नामांतर :

  • शिवसेनेसाठी राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या नामांतरांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली.
  • औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली़.
  • नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
  • शिवसेनेतील बंडाळीमुळे अस्थिर राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
  • आता हा प्रस्ताव नियमाप्रमाणे पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी केंद्र सरकारला पाठविण्यात येईल. त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल.

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा :

  • मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय.
  • मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीयअसं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.

उपराष्ट्रपतीपदाची 6 ऑगस्टला निवडणूक :

  • उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 6 ऑगस्टला होणार आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी ही घोषणा केली.
  • विद्यमान उपराष्ट्रपती एम.एस्सी. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी काढली जाणार असून 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
  • तर 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
  • तसेच 6 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.
  • लोकसभा व राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतात.
  • तर या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यही सहभागी होतात.

‘क्यूएस’च्या यादीत मुंबईचाही समावेश :

  • विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांची यादी ‘QS’ने जाहीर केली आहे.
  • लंडन आहे जगातील विद्यार्थ्यांसाठीचे सर्वोत्कृष्ट शहर असल्याचे या यादीतून दिसून येत आहे.
  • परदेशातील विद्यार्थ्यांनाही लंडनमध्ये किफायतशीर आणि चांगले शिक्षण मिळत असून विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा, विद्यापीठांचा दर्जा याबाबतीत लंडन सरस असल्याचे या यादीत म्हटले आहे.
  • भारतातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर मुंबई असल्याचेही ‘क्यूएस’ने म्हटले आहे.
  • यंदा 2023 साठीची यादी जाहीर करण्यात आली आहे.
  • लंडननंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर दक्षिण कोरियातील सेऊल आणि जर्मनीमधील म्युनिच ही शहरे आहेत.
  • मुंबई या यादीत 103 व्या क्रमाकांवर असली तरी भारतात विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शहर मुंबई असल्याचे या यादीत म्हटले आहे.

मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धात सिंधू, कश्यपची विजयी सलामी :

  • पीव्ही सिंधूने मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत बुधवारी विजयी सलामी नोंदवली तर सायना नेहवालला गाशा गुंडाळावा लागला.
  • माजी विश्वविजेत्या सिंधूने दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन करीत थायलंडच्या जागतिक क्रमवारीत 10व्या क्रमांकावरील पोर्नपावी चोचूवाँगला 21-13, 21-17 असे नामोहरम केले.
  • सिंधूने चोचूवाँगविरुद्ध आठव्या सामन्यापैकी पाचवा विजय मिळवला आहे.

दिनविशेष :

  • 30 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन आहे.
  • भारतीय रसायनशास्त्रज्ञ ‘चिंतामणी नागेश रामचंद्र राव’ यांचा जन्म 30 जून 1934 मध्ये झाला.
  • जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 हा 1937 मध्ये लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
  • 1965 मध्ये भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
  • केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन 1986 मध्ये मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment