23 ऑक्टोबर 2021 [चालू घडामोडी /Current Affairs ]

इतरांना शेअर करा .......

23 ऑक्टोबर 2021

1. भारत सरकारच्या निधीतून बनवलेला कोणता रेल्वे मार्ग औपचारिकपणे नेपाळला देशाने सुपूर्द केला आहे ? 

उत्तर : जयनगर – कुर्था रेल्वे लिंक.  

2. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल कौन्सिलिंग ऑफ इंडिया ( ESSCI ) चे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : डॉ . अभिलाष गौर.  

3. संरक्षण मंत्रालयाने अमेरिकन सरकारसोबत नेव्हीसाठी कोणते विमान खरेदी करण्यासाठी 423 कोटी रुपयांचा करार केला आहे ? 

उत्तर : Mk 54 टॉरपीडो आणि पाणबुडीविरोधी युद्ध विमान P – 8I.  

4. 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार या दोन हॉलिवूड अभिनेत्यांना प्रदान केला जाईल ? 

उत्तर : मार्टिन स्कॉर्क्झिक आणि इस्टेव्हन सावो.  

5. पंजाब काँग्रेसने प्रभारी सरचिटणीस हरीश रावत यांना पदमुक्त करून राज्याचे नवे सरचिटणीस प्रभारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : हरीश चौधरी.  

6. कोरोनामुळे रद्द झालेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना कधीपासून आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे ? 

उत्तर : 01 जुलै 2022 पासून .  

७. कोणत्या प्रसिद्ध आणि ज्येष्ठ हिंदी अभिनेत्रीचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले ? 

उत्तर : मीनू मुमताज.  

8. आज (23 ऑक्टोबर ) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : जागतिक स्नो लेपर्ड डे.  

9. औषध निर्माता कंपनी Lupinlife ने अभिनेता हृतिक रोशनला कोणत्या ब्रँडसाठी नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे ? 

उत्तर : आयुर्वेदिक ऊर्जा पूरक ब्रँड.  

10. वनप्लस कंपनीने भारताचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : नवनीत नाकरा.  

11. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) कोणत्या दोन नवीन देशांना ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे , आता किती देश ग्रे लिस्टमध्ये आहेत ? 

उत्तर : तुर्की आणि म्यानमार ( एकूण २२ देश ग्रे लिस्टमध्ये आहेत ) 

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : 16,326 (666 मृत्यू ). 


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment