23 जून 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

 

आंतरराष्ट्रीय विधवा दिन

चालू घडामोडी (जून २३, २०२२)

तामिळनाडूतून विंचवाच्या नव्या प्रजातीचा शोध :

 • महाराष्ट्रातील पाच तरुण संशोधकांना तामिळनाडूतून नव्या विंचवाच्या प्रजातीचा शोध लावण्यात यश आले आहे.
 • संशोधकात अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, स्वप्निल पवार, सत्पाल गंगलमाले आणि विवेक वाघे यांचा समावेश आहे.
 • नव्याने सापडलेली प्रजाती ही ‘होरमुरीडी’ कुळातल्या ‘चिरोमॅचेट्स’ या जातीमधील आहे.
 • ‘चिरोमॅचेट्स’ जात ही भारतीय द्विवाल्व्हसाठी प्रांतीय असून त्यात आतापर्यंत पाच प्रजाती ज्ञात होत्या.
 • आता नव्याने शोध लागलेल्या प्रजातीमुळे ही क्रमांक सहावर गेली आहे.
 • पाचमधील तीन प्रजाती या महाराष्ट्र, केरळमध्ये एक आणि आंध्रप्रदेशात एक होत्या.
 • तमिळनाडूत ‘चिरोमॅचेटस’ या जातीची ही पहिलीच नोंद आहे.
 • अगस्त्यामलाई शिखराजवळ हा विंचू आढळून आला म्हणून त्याचे नामकरण ‘चिरोमॅचेट्स अगस्त्यामलाएनसीस’ असे करण्यात आले आहे.

प्रो लीग हॉकी भारताचा अमेरिकेवर विजय :

 • भारतीय महिला हॉकी संघाने वर्चस्वपूर्ण कामगिरी करत ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमधील दुसऱ्या सामन्यात अमेरिकेवर 4-0 अशी मात करत पदार्पणाच्या हंगामातच तिसरे स्थान मिळवले.
 • भारताने पहिल्या लढतीत 4-2 असा विजय नोंदवला होता.
 • भारताकडून वंदना कटारियाने दोन गोल करत निर्णायक भूमिका पार पाडली.
 • अर्जेटिनाने यापूर्वीच लीगचे जेतेपद मिळवले आहे, तर नेदरलँड्सचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
 • भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व मिळवत अमेरिकेला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही.

भारतीय खेळाडूसोबत लँकशायर क्लबने केला करार :

 • इंग्लंडमध्ये आजही पारंपरिक काऊंटी क्रिकेटला फार महत्त्व आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात जुना प्रकार अशी काऊंटीची ओळख आहे.
 • काऊंटी क्रिकेट खेळणे ही आजही खेळाडूंसाठी मोठी प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. आतापर्यंत काही भारतीय खेळाडूंनी देखील काऊंटी क्रिकेट खेळलेले आहे.
 • त्यामध्ये आता लवकरच वॉशिंग्टन सुंदरचेही नाव समाविष्ट होणार आहे.
 • लँकशायर क्रिकेट क्लबने आगामी 50 षटकांच्या चषकासाठी आणि काऊंटी चॅम्पियनशिपसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला करारबद्ध करण्याची घोषणा केली आहे.
 • लँकशायरने आपल्या ट्विटर अकाऊंच्या माध्यमातून सुंदरला करारबद्ध केल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
 • लँकशायर सध्या काऊंटी चॅम्पियनशिप विभागातील गुणतालिकेत सरे आणि हॅम्पशायरच्या मागे तिसऱ्या स्थानावर आहे.
 • व्हिटॅलिटी ब्लास्ट टी-20 सामन्यांनंतर ते 26 जूनपासून ग्लॉस्टरशायरविरुद्धच्या लढतीसह रेड-बॉल क्रिकेट पुन्हा सुरू करतील.

दिनविशेष :

 • 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन आणि संयुक्त राष्ट्र नागरी सेवा दिवस आहे.
 • क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी 23 जून 1868 मध्ये पेटंट मिळाले.
 • २३ जून १८९४ रोजी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
 • भारतीय क्रांतिकारक राजेंद्र नाथ लाहिरी यांचा जन्म 23 जून 1901 रोजी झाला.
 • भारतीय नभोवाणी मुंबई येथे 23 जून 1927 रोजी सुरु.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.