संधी व त्याचे प्रकार

इतरांना शेअर करा .......

संधी व त्याचे प्रकार

  • जोडाक्षरे:-

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास जोडाक्षर म्हणतात.

उदा.

  • विद्यालय : धा : द + य + आ
    पश्चिम  : श्चि : श + च + इ
    आम्ही   : म्ही : म + ह + ई
    शत्रू     : त्रू : त + र + ऊ

जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात. संधी म्हणजे एक प्रकारची जोडाक्षर होय.

उदा.

  • ईश्र्वरेच्छा    = ईश्र्वर + इच्छा
    सूर्यास्त    = सूर्य + अस्त
    सज्जन     = सत् + जन
    चिदानंद     = चित् + आनंद

संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.

  1. स्वरसंधी
    व्यंजन संधी
    विसर्गसंधी

1. स्वर संधी

एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना ‘स्वरसंधी’ असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला ‘स्वरसंधी’ असे म्हणतात.

क) दिर्घत्व संधी

सजातीय र्‍हस्व किंवा दीर्घ स्वरमिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला दिर्घत्व संधी म्हणतात.

उदा.

  • सूर्यास्त = सूर्य+अस्त
    हिमालय = हिम+आलय
    प्रश्नार्थी = प्रश्न+अर्थी
    वृद्धाश्रम = वृद्ध+आश्रम
    हरीश = हरी+ईश
    गिरीश = गिरी+ईश
    कविच्छा = कवी+ईच्छा
    गुरूपदेश = गुरु+उपदेश
    देवालय = देव+आलय
    महेश = मही+ईश
    चंद्रास्त = चंद्र+अस्त
    विद्यार्थी = विद्या+अर्थी
    गुरूपदेश = गुरु+उपदेश
    भूदधार = भू+उद्धार
    गणाधीश = गण+अधीश
    महिंद्र = मही+इंद्र
    विद्याभ्यास = विद्या+अभ्यास
    स्वप्नाभास = स्वप्न+आभास
    गजानन = गज+अनान
    मिष्टान्न = मिष्ट+अन्न

ख) आदेश संधी

दोन विजातिय स्वर एकत्र येऊन तयार होणार्‍या संधीला आदेश संधी म्हणतात.

आदेश संधीचे खालील प्रकार पडतात.
i) गुणादेश

अ किंवा आ या स्वरापुढे जर इ किंवा ई स्वर आल्यास तर त्या दोहोंऐवजी ए हा स्वर येतो, जर उ किंवा ऊ हा स्वर आल्यास तर त्या दोहोंऐवजी ओ स्वर येतो आणि जर ऋ हा स्वर आल्यास तर त्या दोहोस्वरांमिळून अर येतो यालाच  गुणादेश संधी असे म्हणतात.

उदा.

  • ईश्वरेच्छा = ईश्वर+ईच्छा
    गणेश = गण+ईश
    महोत्सव = महा+उत्सव
    चंद्रोदय = चंद्र+उदय
    देवषा = देव+ऋषी
    महर्षी = महा+ऋषी
    यथेष्ट = यथा+इष्ट
    रमेश = रमा+ईश
    धारोष्ण = धारा+उष्ण
    राजर्षी = राजा+ऋषी
    महेश = महा+ईश
    सूर्योदय = सूर्य+उदय
    गंगोदक = गंगा+उदक
    सुरेंद्र = सुर+इंद्र
    भुपेंद्र = भूप+इंद्र
    वसंतोत्सव = वसंत+उत्सव

ii) वृद्ध्यादेश

जर अ आणि आ या स्वरापुढे ए किंवा ऐ स्वर आल्यास तर त्याबद्दल ऐ हा स्वर येतो आणि ओ किंवा औ स्वर आल्यास तर त्याबद्दल औ हा स्वर येतो. यालाच वृद्ध्यादेश (वृद्धि+आदेश) संधी  म्हणतात.

उदा.

  • एकैक = एक+एक
    मतैक्य = मत+ऐक्य
    सदैव = सदा+एव
    जलौध = जल+ओध
    गंगौध = गंगा+ओध
    क्षणैक = क्षण+एक
    प्रजैक्य = प्रजा+ऐक्य
    हातौटी = हात+ओटी

iii) यणादेश

जर इ, उ, ऋ, (र्हास्व किंवा दीर्घ) या स्वरांपुढे खालीलपैकी कोणताही विजातीय स्वर आल्यास तर इ-ई या विजातीय स्वराऐवजी य हा वर्ण येतो, उ-ऊ विजातीय स्वराऐवजी व हा वर्ण येतो. ऋ या स्वराऐवजी र हा वर्ण येतो आणि पुढील स्वर मिसळून यणादेश संधी तयार होते.

उदा.

  • प्रीत्यर्थ = प्रीति+अर्थ
    इत्यादी = इति+आदी
    अत्युत्तम = अति+उत्तम
    प्रत्येक = प्रति+एक
    मन्वंतर = मनू+अंतर
    स्वल्प = सु+अल्प

iv) विशेष आदेश

जर ए, ऐ, ओ किंवा औ या संयुक्त स्वरांपुढे अनुक्रमे ए या संयुक्त स्वराऐवजी आय्, ऐ या संयुक्त स्वराऐवजी आय्, ओ या संयुक्त स्वराऐवजी अव्, औ या संयुक्त स्वराऐवजी आव् असे वर्ण मिसळून आदेश तयार होऊन त्यास पुढील स्वर मिसळून विदेश आदेश संधी तयार होते.

उदा.

  • नयन = ने+अन
    गायन = गै+अन
    गवीश्वर = गो+ईश्वर
    नाविक = नौ+इक

क) पूर्वरूप संधी

मराठीत केव्हा केव्हा संधी होत असतांना एकत्र येणार्‍या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसर्‍या स्वराचा लोप होतो. या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात.

उदा.

  • नदीत = नदी+आत
    काहीसा = काही+असा
    केलेसे = केले+असे
    लाडूत = लाडू+आत
    खिडकीत = खिडकी+आत

ड) पररूप संधी

केव्हा केव्हा एकत्र येणार्‍या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दूसरा स्वर कायम राहतो. अशा प्रकारच्या संधीला पररूप संधी असे म्हणतात.

उदा.

  • करून = कर+ऊन
    घामोळे = घाम+ओळे
    घरी = घर+ई
    नुमजे = न+उमजे
    एकैक = एक+एक
    सांगेन = सांग+एन

2. व्यंजनसंधी

दोन व्यंजने किंवा यापैकी दूसरा वर्ण स्वर असेल तर त्याला मिळून तयार होणार्‍या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात.

व्यंजनसंधीचे खालील उपप्रकार पडतात.
अ) प्रथम व्यंजन संधी

दोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ग, ज, ड, द्, ब (मृदु व्यंजन) यांच्यापैकी आल्यास तर संधी होत असतांना त्याचे जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन (क, च, ट, त, प) येऊन संधी होते त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात.

उदा.

  • वाक्चातुर्य = वाग्+चातुर्य
    षट्शास्त्र = षड्+शास्त्र
    विपत्काल = विपद्+काल
    वाक्पति = वाग्+पति
    क्षुत्पिपासा = क्षुध्+पिपासा
    शरत्काल = शरद्+काल
    वाक्तांडव = वाग्+तांडव
    आपत्काल = आपद्+काल

ब) तृतीय व्यंजन संधी

दोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क, च, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास त्यापासून संधी होत असतांना त्या वर्णाचे जागी त्याच वर्गातील तृतीय व्यंजन येते या संधीला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात.

उदा.

  • वागीश = वाक्+ईश
    वाग्देवी = वाक्+देवी
    अजंत = अच+अंत
    वडानन = वट्+आनन
    सदिच्छा = सत्+इच्छा
    अब्ज = अप्+ज
    सदाचार = सत्+आचार
    सदानंद = सत्+आनंद

ग) अनुनासिक संधी

पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापूढे अनुनासिक आल्यास त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन संधी होते त्यास अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात.

उदा.

  • वाड्निश्चय = वाक्+निश्चय
    षण्मास = षट्+मास
    जगन्नाथ = जगत्+नाथ
    संमती = सत्+मती
    सन्मार्ग = सत्+मार्ग
    तन्मय = तत्+मय

घ) त ची विशेष व्यंजन संधी

या बाबतची विशेष संधी अशी की जर या व्यंजनापुढे
किंवा  आल्यास तर बद्दल येतो.
किंवा  आल्यास बद्दल येतो.
किंवा  आल्यास बद्दल येतो.
ल् आल्यास त बद्दल ल् येतो.
श आल्यास बद्दल होतो व पूढील बद्दल येतो.

उदा.

  • सच्चरित्र = सत्+चरित्र
    उच्छेद = उत्+छेद
    सज्जन = सत्+जन
    सट्टिका = सत्+टीका
    उल्लंघन = उत्+लंघन
    सच्छिष्य = सत्+शिष्य
    उज्ज्वल = उत्+ज्वल
    तल्लीन = तत्+लीन

ड) म ची संधी

म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो. जर व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.

उदा.

  • समाचार = सम्+आचार
    संगती = सम्+गती
    समाप्त = सम्+आप्त
    संताप = सम्+ताप
    संक्रमण = सम्+क्रमण
    संचय = सम्+चय

3. विसर्ग संधी

विसर्ग संधीचे खालील प्रकार पडतात.
क. विसर्ग उकार संधी

विसर्गाच्या पुढे पाच गटापैकी कोणतेही मृदु व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात.

उदा.

  • यशोधन = यश+धन
    मनोरथ = मन:+रथ
    अधोवदन = अध:+वदन
    तेजोनिधी = तेज:+निधी
    मनोराज्य = मन:+राज्य
    अधोमुख = अध:+मुख

ख. विसर्ग-र-संधी

विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होणे.

उदा.

  • निरंतर = नि:+अंतर
    दुर्जन = दु:+जन
    बहिरंग = बहि:+अंग
    बहिव्दार = बहि:+व्दार

ग. विसर्ग र संधी

विसर्ग र संधी होत असतांना विसर्गाच्या मागे अ, आ खेरीज कोणताही स्वर आल्यास त्या विसर्गाचा र होतो जर दूसरा वर्ण असल्यास यावेळी पहिल्या र चा लोप होतो व त्याच्या मागील स्वर र्‍हस्व असल्यास दीर्घ होतो.

उदा.

  • नीरस = नि:+रस
    नीरव = नि:+रव

घ.

विसर्गापुढे च्, छ, ट, त, प, यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाच्या जागी श, ष, व, स येऊन संधी होते.

उदा.

  • दुश्चिन्ह = दु:+चिन्ह
    शनैश्वर = शनै:+चर
    निश्चय = नि:+चय
    दुष्टीका = दु:+टीका
    निस्तेज = नि:+तेज
    चक्षु: = चक्षु:+तेज
    अधस्तल = अध:+तल
    मनस्ताप = मन:+ताप
    निष्फळ = नि:+फळ
    निष्काम = नि:+काम

ड 

विसर्गाच्या पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग स्थिर राहतो.

उदा.

  • रज:कण = रज:+कण
    अध:पात = अध:+पात
    अंत:पटल = अंत:+पटल
    तेज:पुंज = तेज:+पुंज

हे पन वाचा :- वर्णमाला व त्याचे प्रकार | Alphabet and its Types


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment