22 मे 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

 

प्रज्ञानंद

चालू घडामोडी (२२ मे २०२२)

उत्पादन शुल्ककपातीमुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त :

 • भडकलेल्या इंधनदरामुळे महागाईचा चढता आलेख रोखण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात मोठी कपात केली.
 • पेट्रोलवरील उत्पादन शुल्क लिटरमागे आठ रुपयांनीतर डिझेलवरील उत्पादन शुल्क सहा रुपयांनी कमी करण्यात आले.
 • इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला.
 • सरकार गॅस सिलिंडरसाठी 200 रुपयांचे अनुदान देणार असून त्याचा लाभ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना होईल, असेही सीतारामन म्हणाल्या.
 • देशाचे आयात अवलंबित्व अधिक असलेल्या प्लास्टिक उत्पादनांसाठी सरकार कच्चा माल आणि मध्यस्थांवरील सीमा शुल्कही कमी करीत आहे.
 • त्याचबरोबर लोखंड आणि पोलादाच्या काही कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करण्यात येईल.

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धात भारतीय पुरुष कंपाऊंड संघाला सुवर्णपदक :

 • भारतीय पुरुष कंपाऊंड तिरंदाजी संघाने शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात पिछाडीवरून पुनरागमन करत फ्रान्सला दोन गुणांनी पराभूत करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवले.
 • तर मोहन भारद्वाजने वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.
 • विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील भारताची एकूण पदकसंख्या पाच झाली आहे.
 • अभिषेक वर्मा, अमन सैनी आणि रजत चौहानचा समावेश असलेल्या पुरुष कंपाऊंड संघाने जोरदार पुनरागमन करून फ्रान्सला २३२-२३० असे नमवत सुवर्णपदक मिळवले.
 • मग कंपाऊंड तिरंदाज अभिषेक वर्माने अवनीत कौरच्या साथीने भारताला दुसरे पदक मिळवून दिले.
 • भारतीय जोडीने मिश्र सांघिक गटात तुर्की आणि इसे बेरा सुजेरचे अमेरिकन जोडीला १५६-१५५ असे नमवत कांस्यपदक मिळवले.

प्रज्ञानंदचा विश्वविजेत्या कार्लसनवर दुसऱ्यांदा विजय :

 • भारताचा युवा बुद्धिबळपटू प्रज्ञानंदने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनवर वर्षभरात दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचा पराक्रम दाखवला आहे.
 • प्रज्ञानंदने चेसेबल मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत कार्लसनला नामोहरम केले.
 • तीन महिन्यांपूर्वी प्रज्ञानंदने कालर्सनला प्रथमच हरवून सर्वाचे लक्ष वेधले होते.
 • चीनचा वेई यि याने एकटय़ाने आघाडी घेतली असून कार्लसन दुसऱ्या स्थानावर आहे.
 • फेब्रुवारीत झालेल्या एअरिथग्ज मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत प्रज्ञानंदने कार्लसनला हरवून बुद्धिबळ जगताला धक्का दिला होता.
 • कार्लसनला हरवणारा प्रज्ञानंद हा भारताचा तिसरा बुद्धिबळपटू ठरला घडतात.

दिनविशेष :

 • 22 इंच : जागतिक जैवाविविधता दिन.
 • समाजसुधारक, धर्मसुधारक आणि ब्राह्मसमाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा 1772 चा 22 रोजी जन्म झाला.
 • 1762 चा 22 मध्ये स्वीडन आणि प्रशियामध्ये हॅम्ब्बुर्गचा तह झाला.
 • राइट बंधूंनी उडणार्‍या यंत्राचे (Flying Machine) पेटंट 1906 चा 22 मध्ये घेतले.
 • विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म सन 1783 मध्ये 22 मे रोजी झाला.
 • 1972 मध्ये 22 रोजी सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
 • भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 मध्ये 22 रोजी सूत्रे हाती घेतली.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment